Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News : महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध ‘दलिंदर आणि बिलंदर’ जोडी’, ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Jyoti Waghmare on Thackeray brothers: महानगरपालिकेतच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 12, 2026 | 01:40 PM
महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध 'दलिंदर आणि बिलंदर' जोडी', ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध 'दलिंदर आणि बिलंदर' जोडी', ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध ‘दलिंदर आणि बिलंदर’ जोडी’
  • ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
  • निवडणुका आणि ‘मराठी माणूस’ नावाचे कार्ड
Jyoti Waghmare on Thackeray brothers News In Marathi : राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. अशातच राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. याचदरम्यान शिंदे गटातील ज्योती वाघमारे यांनी शिवाजी पार्कवर पार पडलेल्या ठाकरे बंधुच्या सभेवर टिका केली आहे.

ठाकरे बंधूंची संयुक्त सभा रविवारी शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषण करत अनेक मुद्दे मांडत मराठी मतदारांसमो ठाकरेंची भूमिका मांडली. तसेच राज आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी भाषणांमध्ये विविध मुद्दे मांडले. याचदरम्यान या सभेवर शिंदे गटातील ज्योती वाघमारे यांनी या सभेवर जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध ‘दलिंदर आणि बिलंदर’ जोडी

एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे ‘धुरंदर’ नेतृत्व आहेत. याउलट, एक भाऊ जगात कोरोना आला असताना घरात बसून राहणारा ‘दलिंदर’, तर दुसरा ‘खळखट्याक’ची भाषा करणारा ‘बिलंदर’ आहे. महाराष्ट्राची जनता या ‘रहमान डकैत’ प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कालची सभा म्हणजे विचारांचे मंथन नव्हते, तर आपला परिवार आणि राजकीय अस्तित्व वाचवण्याची केविलवाणी धडपड होती. सभेत लोकांचा उत्साह नव्हता, तर ‘कंटाळवाणी’ भाषणं आणि ‘लाचार’ माणसं दिसत होती, असा घणाघात ज्योती वाघमारे यांनी ठाकरे बंधूवर केला आहे.

 उत्पन्न लाखात मात्र संपत्ती करोडोंची ; पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरलेले माजी नगरसेवक

अदानींवर टीका आणि पवारांशी मैत्री – हे कसले दुटप्पी धोरण?

गौतम अदानींवर टीका करायची, पण त्यांच्याच गाडीचे सारथ्य करणाऱ्या रोहित पवारांशी आणि अदानींना मार्गदर्शक मानणाऱ्या शरद पवारांशी युती करायची? हे ‘दुतोंडी’ वागणं महाराष्ट्र बघतोय. राजकीय स्वार्थासाठी स्वतःची तत्त्वं गहाण ठेवणं कधी बंद करणार? असं देखील ज्योती वाघमारे यांनी सांगितलं.

निवडणुका आणि ‘मराठी माणूस’ नावाचे कार्ड

केवळ निवडणुका आल्यावरच तुम्हाला ‘मराठी माणूस’ का आठवतो? सत्ता असताना मराठी माणसासाठी काय केलं? राज्याच्या हितापेक्षा तुम्हाला स्वतःच्या खुर्चीची काळजी जास्त आहे. लोकसभेत बिनशर्त पाठिंबा, विधानसभेत विरोध आणि महापालिकेत पुन्हा एकत्र? तुमचा नक्की ‘केमिकल लोच्या’ झाला आहे का? जनतेला वेड्यात काढण्याचे धंदे आता चालणार नाहीत. कधी भोंग्यांच्या विरोधात बोलायचं तर कधी हिंदुत्वाचं सोंग घ्यायचं, हे ढोंग जनता ओळखून आहे.

बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना देणारे राजकारण

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ‘जनाब बाळासाहेब’ करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? राम मंदिर आणि कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. सोनिया गांधींच्या चरणी नतमस्तक होताना साहेबांच्या आत्म्याला किती यातना झाल्या असतील, याचा विचार करा. मुंबई तोडण्याची ‘शिळी कढी’ किती दिवस गरम करणार? गेल्या २५ वर्षांत जे झालं नाही, ते अडीच वर्षांत शिंदे साहेबांनी करून दाखवलं. कोस्टल रोड, अटल सेतू, धारावी पुनर्विकास आणि मराठी भाषेला मिळालेला ‘अभिजात दर्जा’ ही आमची उत्तरं आहेत. जपानमध्ये मराठी भवन आणि महाराष्ट्राला स्वतःचं राज्यगीत मिळवून देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. “बाप के विचार बेचने वालो पर हर कोई शर्मिंदा है, खिचडी, पत्राचाळ और बॉडी बॅग घोटालों का इनका काला धंदा है! फेसबुक लाईव्ह करने वालो की हर कोई करता निंदा है, लेकिन याद रखना, मुंबई और महाराष्ट्र को बचाने के लिए टायगर (एकनाथ शिंदे) अभी जिंदा है!”, असं म्हणत ज्योती वाघमारे यांनी ठाकरे बंधुवर हल्लाबोल केला आहे.

“ही सगळी लाचार माकडं!” उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला; जाणून घ्या भाषणातील ठळक मुद्दे

Web Title: Shivsena jyoti waghmare strong criticism of the thackeray brothers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Eknath Shinde
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
1

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
3

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
4

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.