मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) हजर झाल्यावर गुप्त बैठक झाली होती. दोघेही तासभर गप्पा मारत असल्याचे समोर आले होते. यावेळी काही पोलीसदेखील हजर होते. त्यांनाच आता नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice To Navi Mumbai Police) बजावली आहे.
[read_also content=”‘या’ कारणामुळे योगी आदित्यनाथ यांनी धरली गोरखपूरची वाट, अयोध्येतून निवडणूक लढण्यावर मारली काट https://www.navarashtra.com/latest-news/reasons-behind-yogi-adityanath-fighting-from-gorakhpur-nrsr-223857.html”]
दिलीप वळसे पाटील यांची तीव्र नाराजी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ सहायक उपनिरीक्षक सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगाच्या शेजारी ज्या खोलीत त्यांची कथित गुप्त बैठक घेतली त्या खोलीत एका उपनिरीक्षकासह चार पोलीस उपस्थित होते. मात्र, ते इंग्रजीत बोलत असल्यानं दोघांमधील संभाषणातील एकही शब्द समजला नाही, असा दावा पोलिसांनी केला होता. दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याचे कळताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीसंबंधी चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले होते. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट कशी घेतली, असा सवाल वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला आहे.
कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
त्यानंतर वाझे आणि परमबीर सिंह यांच्यामध्ये झालेल्या बैठकीवेळी हजर असलेले चार पोलिस कर्मचारी दोषी आढळले आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.