Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आघाडीतून बाहेर पडण्याची ठाकरेंची धमकी, पडद्यामागे उलथापलथी; MLC निवडणुकीपूर्वी काय काय घडले?

विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्या निकालाचे आकडे सुरूवातीपासूच वरखाली होत होते. पण काँग्रेसच्या मतांच्या जोरावर मिलींद नार्वेकर यांचा विजय झाला. काँग्रेसच्या मतदारांमुळे ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकरांचा विजय झाल्याचा दावा केला जात आहे. पण मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्यात पडद्यामागे मोठ्या उलथापालथी झाल्याचे वृत्त या वृत्तवाहिनीने दिले आहे.  

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 15, 2024 | 12:05 PM
आघाडीतून बाहेर पडण्याची ठाकरेंची धमकी, पडद्यामागे उलथापलथी;  MLC निवडणुकीपूर्वी काय काय घडले?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषदच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.  या निवडणुकीत महायुतीने 12 पैकी 9 जागा जिंकल्या, तर इंडिया आघाडीचा 2 जागांवर विजय झाला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठिंबा दिलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत  पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीतही मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. जयंत पाटील यांच्या पराभवाची  कारणे सांगितली गेली. पण आता आणखी एक कारण समोर आले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत मोठी खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्या निकालाचे आकडे सुरूवातीपासूच वरखाली होत होते. पण काँग्रेसच्या मतांच्या जोरावर मिलींद नार्वेकर यांचा विजय झाला. काँग्रेसच्या मतदारांमुळे ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकरांचा विजय झाल्याचा दावा केला जात आहे. पण मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्यात पडद्यामागे मोठ्या उलथापालथी झाल्याचे वृत्त या वृत्तवाहिनीने दिले आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला यांच्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत मतदारांच्या यादीवरून मोठे मतभेद झाले होते. शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार जयंत पाटील की ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर यांना मतदान करण्यावरून काँग्रेसमध्येच दोन गट पडले होते. त्यातच काँग्रेसने दिलेल्या मतदारांची यादी उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावली आणि नार्वेकर यांना मतदान करतील, अशा आमदारांची यादी काँग्रेसला दिली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बंटी पाटील, नसीम खान आणि  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव गटाला पाठिंबा देत आवश्यक ७ मतांचा कोटा ठाकरे गटाला दिला होता. पण काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे शरद पवार यांच्या बाजूने होते.  त्यामुळे  ठाकरे गटाच्या नेत्यांनी  वडेट्टीवार आणि थोरात यांना विरोध करत उघडपणे अविश्वास व्यक्त केला.

तर निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या मुलाने आणि पुतण्याने ठाकरे गटाच्या आमदारांवर कट रचत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यातील तणाव वाढला होता. त्याने उद्धव ठाकरेंही चांगलेच संतापले होते.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी या घटक पक्षांमध्ये तणाव वाढल्याने  त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एमएलसी निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची धमकीही दिली होती.  दावा या वृत्तात करण्यात आला आहे. मतदानापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी  उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक वेळा फोन केले, पण ते उद्धव ठाकरेंनी त्यांचे फोनही घेतले नाहीत.

मिलींद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यातील लढत कशी झाली?

या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 23 मतांचा कोटा आवश्यक होता. काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर पहिल्या फेरीतच ठाकरे गटाची 15, काँग्रेसचे 7 आणि 1 अपक्ष अशा मतांनी मिलींद नार्वेकर  निवडून येणे अपेक्षित  होते. पण बराच वेळ 17 आणि 22 मतांमध्येच ते अडकून पडले होते. एका मतासाठी त्यांना खूपवेळ वाट पाहावी लागली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत 23 मते घेऊन नार्वेकर विजयी झाले.

पण दुसरीकडे, पहिल्या फेरीत काँग्रेसचे एक मत फुटल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याने काँग्रेसमध्येही मोठा तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसने गद्दार आमदारांविरोधात कारवाईचा बडगाही उगारला आहे.

Web Title: Thackerays threat to quit the alliance behind the scenes upheaval what happened before the mlc election nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • Congress
  • Jayant patil.     Maharashtra Politics
  • Nana patole
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
3

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
4

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.