मुंबई : गानसम्राग्नी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले, असे शोकसंदेशात सुप्रिया म्हणल्या आहेत.
‘जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.’ ‘भारतीयांच्या भावविश्वात अढळस्थान मिळविलेल्या ‘गानकोकिळा’ अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (दीदी) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. लतादिदी मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या. त्या बऱ्या होऊन परत येतील असा विश्वास होता. पण नियतीला हे मान्य नव्हते.’ असे सुप्रिया सुळेंनी त्यांच्या शोकसंदेशात म्हणटले आहे.
एक सूर्य, एक चंद्र, एक लता मंगेशकर : चित्रा वाघ
– Chitra Kishor Wagh (@ChitraKishorWaghCRKB) 6 Feb 2022
भारताचा सुमधुर सूर हरपला : चद्रकांत पाटील
– Chandrakant Patil (@ChDadaPatil) 6 Feb 2022