नवी मुंबई विमातळावर पोहोचता येणार फक्त १७ मिनिटात? मुंबईतून थेट वॉटर टॅक्सी धावणार?
भारतात अनेक विमानतळ आणि विमान सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. नव्या आतंरराष्ट्रीय विमातळांची निर्मितीही करण्यात येत आहे. देशातील गजबजलेल्या मुंबई शहारानजीक उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचंही (NMIA) लवकरच लोकार्पण होणार आहे. मुंबई गजबजलेले शहर असून दररोज लाखो लोक या शहरात येत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी गर्दी असते, परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि सर्वांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) एप्रिल २०२५ मध्ये उद्घाटन होणार आहे. विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिल २०२५ रोजी होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर १५ मे पासून विमानसेवा सुरू होईल. २९ डिसेंबर २०२४ रोजी, इंडिगो ए ३२० विमानाची चाचणी उड्डाणादरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एनएमआयए) यशस्वीरित्या उतरले. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी विमानतळाबाबत अनेक चाचण्या केल्या. २४ फेब्रुवारी रोजी दिवसभर तपासणी केल्यानंतर, सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा विमानतळाला भेट दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) १,१६० हेक्टर क्षेत्रफळावर उभारण्यात आलं आहे. सुरुवातीला टर्मिनल क्रमांक १ वरून विमानांचं उड्डाण आणि लॅंडींग होईल. ज्याची वार्षिक क्षमता २ कोटी प्रवाशांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तुलनेत येथे कमी उड्डाणे चालविली जातील, परंतु हळूहळू उड्डाणांची संख्या वाढवली जाईल. यासोबतच, विमानतळावर तिन्ही बाजूंनी पोहोचता येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ४बी (३४८), सायन पनवेल महामार्ग आणि अटल सेतू मार्गाने येथे पोहोचता येणार आहे.
मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. अहवालानुसार, दरवर्षी या विमानतळावरून ४ ते ५ कोटी प्रवासी प्रवास करतात. या विमानतळावर दररोज ताशी ४०-५० उड्डाणे आणि ९५० हून अधिक उड्डाणे व्यवस्थापित केली जातात.
मुंबई हे एक असे शहर आहे जिथे संपूर्ण भारतातील लोक कामाच्या शोधात येतात. अशा परिस्थितीत येथील वाहतूक व्यवस्था शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे सुरुवातीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) ते प्रमुख मेट्रो आणि प्रादेशिक स्थळांपर्यंत चांगल्या वाहतूक कनेक्टिव्हिटीसह विमान सेवांचे नियोजन केले जाऊ शकते. त्यानंतर मुंबईतील लोकांना प्रवासात खूप आराम मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्त्याने तसेच जलमार्गाने जोडण्याची योजना आखली जात आहे. जर हे शक्य झाले तर वॉटर टॅक्सीद्वारे प्रवासी फक्त १७ मिनिटांत विमानतळावर पोहोचू शकतील.