Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Nagpur Protest: नागपुरात अवतरली ‘जेन-झी’ पिढी! कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने संविधान चौक दणाणला

Nagpur paper leak : आंदोलनात येणारे विद्यायी स्वतःला काँक्रोच म्हणवून घेत होते. त्यांनी सोबत आणलेले कत्यक पोस्टर्स लक्ष वैधून घेत होते. अनेक पालकांनी तर मुले सोबत आणली, नागपूरचे विविध संस्थांचे आंदोलनकर्तेही यात सहभागी झाले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 17, 2026 | 12:47 PM
CJP Nagpur paper leak protest:

CJP Nagpur paper leak protest:

Follow Us
Follow Us:
  • पेपरफुटीविरोधात नागपुरात हजारो विद्यार्थ्यांचा एल्गार
  • अभिजीत दिपके आणि सत्यपाल महाराजांची मोदी सरकारवर घणाघाती टीका
  • आमदार खरेदीला पैसा, पण आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीला मदत नाही
CJP Nagpur paper leak protest: ‘ज्यांना विद्यार्थी, शिक्षण, रोजगार याबद्दल तळमळ नाही, कळत नाही असे अशिक्षित सरकार आम्हाला नको आहे’ या शब्दात केंद्र सरकारचा निषेध करीत मंगळवारी हजारों कॉकरोच  संतापले. जोरदार घोषणाबाजी करीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मोदी सरकारलाही धारेवर धरले. इतर राजकीय पक्षांवरही टीकेची झोड उठविली. आंदोलनाने एकप्रकारे नागपुरातही जेन-झी अवतरल्याचे चित्र नागपूरकरांनी अनुभवले.  (Cockroach Janta Party)

संविधान चौकात झालेल्या आंदोलनात हजारोंच्या संख्येत विद्यार्थी, तरुण-तरुणी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिला, वृद्ध सहभागी झाले होते. ‘कॉकरोच’ च्या आंदोलनपीठावर अभिजित दीपके, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्यासह काँक्रोचचे पाठीराखे होते. विद्यार्थी, दीपके यांनी प्रधान यांचा राजीनामा हवाच, अशी हाक दिली. जोवर राजीनामा होणार नाही, तोवर काँक्रोच देशभर पसरतील असा इशारा दिला.

CJP Nagpur Protest: जयपूरनंतर आता नागपुरात CJPचे वादळ धडकणार! पेपरफुटीविरोधात आज तरुणांचे भव्य आंदोलन

दरम्यान, दीपके यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन सांत्वन करण्याची किंवा आर्थिक मदत देण्यासाठी वेळ नाही. मात्र, आमदारांच्या खरेदीसाठी पैसा आहे. सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनीही तरुणाईला साद घातली.

सध्याच्या व्यवस्थेवरही त्यांनी ताशेरे ओढले. दुर्गेश कुहीके, वैभव चोपकर, वरद डोलीकर, चैतन्य ध्रुव, मंथन, भारत बानाईत, सुरभी कलारीया, गोविंद पोलाद, ऋषभ राऊत, आकाश टाले आदींनीही विचारपीठावरून तरुणाई, विद्यार्थ्यांना हाक
दिली. ‘कॉक्रोच’ मोठ्या संख्येत येणार असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला. जवळपास ८०० पोलिस तैनात होते, साध्या वेशातही पोलिस लक्ष ठेवून होते. पोलिस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकारी चौकात जातीने हजर होते.

पोस्टर्स, तरुणाई, पालकांनी वेधले लक्ष

आंदोलनात येणारे विद्यायी स्वतःला काँक्रोच म्हणवून घेत होते. त्यांनी सोबत आणलेले कत्यक पोस्टर्स लक्ष वैधून घेत होते. अनेक पालकांनी तर मुले सोबत आणली, नागपूरचे विविध संस्थांचे आंदोलनकर्तेही यात सहभागी झाले होते.

Chandrashekar Bavankule News: बुडत्या जहाजात कोणी बसणार नाही! राष्ट्रवादी-काँग्रेस विलीनीकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

 

‘आकांक्षा’च्या कुटुंबीयांचे सांत्वन

नीट परीक्षा रद्द झाल्याने आत्महत्या करणाऱ्या आकांक्षा चतुर्वेदी या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे अभिजित दीपके यांनी सांत्वन केले. देशातील समस्त विद्यार्थी आपणासोबत असल्याचे व यासंदर्भातील निर्णयाप्रत जात नाही तोवर आंदोलन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली,

दोनदा उदभवले वादाचे प्रसंग

आंदोलनाला विरोधाचे दोन प्रसगही घडले. यात एका गटाने पंतप्रधान मोदीविरोधातील घोषणाबाजीला विरोध दर्शवला, काँक्रोचने हा प्रकार हाणून पाडला, त्यानंतर एका दुसऱ्या गटानेही तसाच प्रयत्न केला, पोलिसानी वेळीच हस्तक्षेप केला. तरुणीने गोमाता संदर्भात आणलेल्या पोस्टरने वाद झाला. पोलिसांनी ताही परिस्थिती हाताळली.

 

 

 

Web Title: Nagpur gen z protest cockroach janata party samvidhan chouk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Nagpur
  • Paper Leak Case
  • Student Protest

संबंधित बातम्या

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल
1

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल

Mumbai News : ‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी
2

Mumbai News : ‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी

धक्का असा की Jharkhand सरकारला पचणारच नाही! JPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची थेट…
3

धक्का असा की Jharkhand सरकारला पचणारच नाही! JPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची थेट…

झारखंड परीक्षा आंदोलनाला मोठे यश; परीक्षा रद्द झाल्यानंतर देवेंद्र महतो यांच्यासह तिघांचे उपोषण मागे
4

झारखंड परीक्षा आंदोलनाला मोठे यश; परीक्षा रद्द झाल्यानंतर देवेंद्र महतो यांच्यासह तिघांचे उपोषण मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.