एकनाथ शिंदे (फोटो- ट्विटर)
Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. तर १३ प्रस्तापित नेत्यांना स्थान मिळालं. विधानपरिषदेतील एकमेव आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारचे सर्व मंत्री एकूण ४३ खात्यांचा कार्यभार सांभाळणार आहे. त्यात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्र्याचा समावेळ असणार आहे. दरम्यान शपथविधी झाल्यानंतर सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले.
महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “गेले अडीच वर्षे आम्ही एक टीम म्हणून काम केले. मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना देवेनदर फडणवीस यांचा अनुभव मला कामी आला. विदर्भात अधिवेशन होत आहे. गेल्या अडीच वर्षांत विदर्भासाठी देखील काम केले. ”
पुढे बोलताना शिंदे म्हणाले ,”देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो. 27 व्या वर्षी फडणवीस हे महापौर झाले. 44 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. मी पुन्हा येईन या वक्तव्याची विरोधकांनी टिंगल उडवली. मात्र ते परत आलेच. विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्यांना कमी लेखणार नाही. त्यांनी अडीच वर्षात आम्हाला हळक्यात घेतले. आम्ही त्यांनी हलक्यात घेणार नाही. त्यांच योग्य तो मान ठेवू.
महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजप २०, शिवसेना १२, राष्ट्रवादी १० मंत्री असणार आहेत. त्यात भाजपचे १६ कॅबिनेट मंत्री, ३ राज्यमंत्री, शिवसेनेचे ९ कॅबिनेट, २ राज्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस ८ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्र्या समावेश असणार आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजित पवार, उपमुख्यमंत्री
चंद्रशेखर बावनुकळे (भाजप)
आशिष शेलार (भाजप)
राधकृष्ण विखे (भाजप)
जयकुमार रावल (भाजप)
पंकजा मुंडे (भाजप)
अतुल सावे (भाजप)
अशोक उईके(भाजप)
गणेश नाईक (भाजप)
मंगलप्रभात लोढा (भाजप)
शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)
चंद्रकांत पाटील (भाजप)
गिरीश महाजन (भाजप)
जयकुमार गोरे (भाजप)
संजय सावकरे (भाजप)
नितेश राणे (भाजप)
आकाश फुंडकर (भाजप)
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस)
नरहळी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
दत्ता भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
धनजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
दादा भुसे (शिवसेना)
संजय राठोड (शिवसेना)
उदय सामंत (शिवसेना)
शंभूराजे देसाई (शिवसेना)
गुलाबराव पाटील (शिवसेना)
संजय शिरसाट (शिवसेना)
प्रताप सरनाईक (शिवसेना)
भरत गोगावले (शिवसेना)
प्रकाश अबिटकर (शिवसेना)
मेघना बोर्डीकर (भाजप)
पंकज भोयर (भाजप)
माधुरी मिसाळ (भाजप)
योगेश कदम (शिवसेना)
इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
आशिष जैयस्वाल (शिवसेना)