अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजपकडे पक्ष प्रवेशाची मोठी यादी; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. तर १३ प्रस्तापित नेत्यांना स्थान मिळालं. विधानपरिषदेतील एकमेव आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारचे सर्व मंत्री एकूण ४३ खात्यांचा कार्यभार सांभाळणार आहे. त्यात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्र्याचा समावेळ असणार आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजप २०, शिवसेना १२, राष्ट्रवादी १० मंत्री असणार आहेत. त्यात भाजपचे १६ कॅबिनेट मंत्री, ३ राज्यमंत्री, शिवसेनेचे ९ कॅबिनेट, २ राज्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस ८ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्र्या समावेश असणार आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजित पवार, उपमुख्यमंत्री
चंद्रशेखर बावनुकळे (भाजप)
आशिष शेलार (भाजप)
राधकृष्ण विखे (भाजप)
जयकुमार रावल (भाजप)
पंकजा मुंडे (भाजप)
अतुल सावे (भाजप)
अशोक उईके(भाजप)
गणेश नाईक (भाजप)
मंगलप्रभात लोढा (भाजप)
शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)
चंद्रकांत पाटील (भाजप)
गिरीश महाजन (भाजप)
जयकुमार गोरे (भाजप)
संजय सावकरे (भाजप)
नितेश राणे (भाजप)
आकाश फुंडकर (भाजप)
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस)
नरहळी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
दत्ता भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
धनजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
दादा भुसे (शिवसेना)
संजय राठोड (शिवसेना)
उदय सामंत (शिवसेना)
शंभूराजे देसाई (शिवसेना)
गुलाबराव पाटील (शिवसेना)
संजय शिरसाट (शिवसेना)
प्रताप सरनाईक (शिवसेना)
भरत गोगावले (शिवसेना)
प्रकाश अबिटकर (शिवसेना)
मेघना बोर्डीकर (भाजप)
पंकज भोयर (भाजप)
माधुरी मिसाळ (भाजप)
योगेश कदम (शिवसेना)
इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
आशिष जैयस्वाल (शिवसेना)
राज्याची विधानसभा निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. महाविकास आघाडीला केवळ ४६ जागा जिंकता आल्या. मात्र मोठं बहुमत मिळवूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस लागले.
पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सत्तास्थापनेचा विश्वासदर्शक ठराव जिंकला. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान महायुती सरकारच्या विस्ताराची प्रतीक्षा राज्यातील जनतेला होती. अखेर सत्तास्थापनेनंतर १० दिवसांनी आज नागपुरात महायुती सरकारचा विस्तार झाला. महायुतीच्या एकूण ३९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून येत्या दोन दिवसात खाते वाटप होणार आहे.