'सूर्यघर' मध्ये नागपूर जिल्हा अव्वल; स्वस्त वीज पोहोचविण्याचा प्रयत्न
नागपूर जिल्ह्याने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत राज्यात भरारी घेतली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील 33,641 घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच लावण्यात आले आहेत. ही राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक संख्या आहे. या संचामधून 132.35 मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याची प्रचंड क्षमता जिल्ह्याने विकसित केली आहे.
शेअर बाजारातील तेजी थांबली, गुंतवणूकदारांनी काय करावे? ब्रोकरेजने सुचवले ‘हे’ स्टॉक
राज्यात महावितरणच्या अधिनस्थ असलेल्या भागात 2,12,640 सौरऊर्जा निर्मिती संच स्थापित करण्यात आले. ज्याची एकूण क्षमता 812.76 मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती आहे. या योजनेच्या माध्यमातून घराघरात स्वच्छ आणि स्वस्त वीज पोहोचवण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात नागपूर जिल्हा अग्रेसर आहे. विशेष म्हणजे, 15 जून 2025 रोजी एकाच दिवसात नागपूरमध्ये 124 नवीन सौर वीज निर्मिती संच उभारण्यात आले, ज्यांची स्थापित वीज निर्मिती क्षमता 452.44 किलोवॅट आहे. हा आकडा एकट्या नागपूरने एका दिवसात उभारलेल्या क्षमतेचे निदर्शक आहे, जे या योजनेच्या अंमलबजावणीतील जिल्ह्याच्या प्रभावी गतीला अधोरेखित करते.
बेलराईज इंडस्ट्रीजने कमावला भरघोस नफा, कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी? जाणून घ्या
‘सूर्यघर’ योजनेत सहभागी व्हाः या अभियानाचा भाग होऊन आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच स्थापित करून वीज बचतीसोबतच पर्यावरण संवर्धनात हातभार लावू शकता. अधिक माहितीसाठी महावितरणच्या https://www.ma-hadiscom.in/ismart/index. php या संकेतस्थळाला किंवा नजिकच्या कार्यालयाशी अथवा केंद्र शासनाच्या https://pmsuryaghar.gov.in/#/या संकेतस्थळाला भेट द्या आणि या पर्यावरण संवर्धनाच्या क्रांतीमध्ये सहभागी होता येते.