
Nagpur मध्ये सुटकेचा थरार! ८०० विद्यार्थी तीन-चार फुट पाण्यात अडकले; मानवी साखळी करत..., पहा Video
मंगळवारी म्हणजेच आज सकाळपासून नागपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुले नागरिकांची तारांबळ उडल्याचे पाहायला मिळाले. पावसाचा जोर वाढत असल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे.
जोरदार पावसामुळे नागपूरमधील दोन शाळा परिसरात पाणी सचण्यास सुरुवात झाली. शाळा परिसरात 2 ते 3 फुट पाणी साचले. त्यामुळे जवळपास 800 विद्यार्थी शाळेत अडकून पडले. दरम्यान विद्यार्थी अडकले असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे शाळेचे मैदान आणि मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. तसेच पाण्याचा परवश देखील प्रचंड स्वरूपात होता. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. शाळेची इमारत ते मुख्य रास्ता या ठिकाणी मजबूत दोरी बांधण्यात आली. त्या ठिकाणी पालक आणि नागरिकांनी मानवी साखळी तयार केली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरूवात करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
Nagpur, Maharashtra: Continuous rainfall since morning caused severe waterlogging at Somalwar School in Khamla on Rana Pratap Nagar Road, with knee-deep water inundating the campus and playground. The Municipal Corporation’s Fire Department launched a rescue operation, safely… pic.twitter.com/dCFjQivIfz — IANS (@ians_india) July 28, 2026
नागपूरमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावरही झाला आहे. वाहतुकीवर देखील त्याच परिणाम झाल्याचे दिसून आले. वाहतुकीचा वेग मंदावला असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागला.