राज्याला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- सोशल मिडिया)
पुढील काही दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर देखील अति ते अति जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासू राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई वेधशाळेचा इशारा काय?
मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांचा (२७ ते ३१ जुलै, २०२६) हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. या दरम्यान अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट; काही ठिकाणी अतिवृष्टी तर घाटमाथ्यावर…, IMD चा अलर्ट काय?
27 जुलै ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह पुस होण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहराला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेली काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहरात गोदावरी नदी दुथदफी भरून वाहत आहे.
Maharashtra Rain Alert: अक्षरश: धुवून काढणार! कोकणात अतिमुसळधार तर…; IMD ने दिला ‘हा’ अलर्ट
मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांचा (२७ ते ३१ जुलै, २०२६) हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. या दरम्यान अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य… pic.twitter.com/vy80nU2Pcn — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 27, 2026
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील महत्वाच्या धारणांच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण साखळी तुडुंब भरली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभरची चिंता मिटली आहे. तसेच सोलापूरमधील उजनी धरण देखील भरले आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण देखील जवळपास 70 ते 75 टक्के भरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास राज्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






