Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घोटाळ्यावरुन नाना पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले, डोळ्यातील अश्रू…

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत म्हणूनच राज्य पेटले आहे, असा घणाघाती आरोप करत फडणविसांनी अशी वकिली सोडून मुख्यमंत्रीपदाला न्याय देण्याचे काम करावे, असे नाना पटोले यांनी म्हटले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 30, 2025 | 04:27 PM
घोटाळ्यावरुन नाना पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले, डोळ्यातील अश्रू...

घोटाळ्यावरुन नाना पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले, डोळ्यातील अश्रू...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु असून, दररोज एका मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. हिवाळी अधिवेशनात बीड व परभणीतील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिले त्यातूनच चित्र स्पष्ट झाले. एखादा निष्णात वकील जसा आरोपीला वाचवण्याचे काम करतो तेच काम मुख्यमंत्री यांनी केले. फडणविसांनी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून भाषण केले नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत म्हणूनच राज्य पेटले आहे, असा घणाघाती आरोप करत फडणविसांनी अशी वकिली सोडून मुख्यमंत्रीपदाला न्याय देण्याचे काम करावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सरकारमध्ये परिस्थिती भयावह आहे, सरकारला लाडक्या बहिणीची चिंता नाही. २४ लाख विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत त्यातील लाखो बहिणींना सरकार नोकरी देऊ शकत नाही. लाडक्या बहिणींचे पती शेतकरीही आहेत आणि हा शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे. सोयाबिनला ६ हजार रुपयांचा भाव देणार होते पण ३ हजाराचाही भाव मिळत नाही, धान, कांदा, कापसाची स्थितीही अशीच आहे. भावांतर योजना लागू करून फरक देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले. सरकार फक्त जनतेला लुटण्यासाठी सत्तेत आले आहे. भाजपा युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री कलंकीत आहेत. दररोज महाराष्ट्राची प्रतिमा खराब केली जात आहे. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज उघड होत आहेत तीच परिस्थिती पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच भ्रष्टाचार झाल्याचे उघड सांगत आहेत. मागील अडीच वर्षापासून हेच सुरु आहे. शेतकऱ्यांच्या योजनेत ४ टक्के भ्रष्टाचार होतो हे मंत्र्यांनीच सांगितले.

बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळा झाला नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचा आमदारच पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगतो, कृषी मंत्र्यांनीही भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार जर घोटाळा झालाच नाही असे म्हणत असतील तर ते धादांत खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलू नये, कशासाठी ते खोटे बोलत आहेत, असा प्रश्न विचारून अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू व शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या कपाळावरचे कुंकू विसरू नये, असे पटोले म्हणाले.

Web Title: Nana patole has criticized ajit pawar over the crop insurance scam nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Beed News
  • cmomaharashtra
  • dhananjay munde
  • maharashtra
  • Nana patole

संबंधित बातम्या

अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा
1

अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा

Amol Mitkari on Rajan Patil: “…. वाया गेलेली मोकाट कार्टी! अजित पवारांना डिवचणाऱ्यांवर मिटकरींची जहरी टीका
2

Amol Mitkari on Rajan Patil: “…. वाया गेलेली मोकाट कार्टी! अजित पवारांना डिवचणाऱ्यांवर मिटकरींची जहरी टीका

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
3

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

सोलापुर जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष आमनेसामने; भाजपला टक्कर देण्यासाठी मित्रपक्ष सज्ज
4

सोलापुर जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष आमनेसामने; भाजपला टक्कर देण्यासाठी मित्रपक्ष सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.