नांदेडमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी यासाठी मुंबईमध्ये बैठकी सुरु आहेत (फोटो - सोशल मीडिया)
नांदेड : महानगरपालिकेच्या नांदेड-वाघाळा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंद गट) यांच्यातील युतीच्या हालचालींना निर्णायक टप्प्यावर बैठान पोहोचली आहे. नांदेडमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चाना अपेक्षित यश न मिळाल्याने आत्ता या पुतीची बोलणी थेट मुंबईत सुरू असल्याची विश्वासार्ह माहिती समोर येत आहे. राज्यस्तरावर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या चर्चाकडे नांदेडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती व्हावी, यासाठी ठामपणे आग्रही असल्याचे समजते. स्थानिक पातळीवर हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळून विकासाभिमुख आणि स्थिर नेतृत्व देण्यासाठी युती आवश्यक असल्याची भूमिका शिवसेनेकडून मांडली जात आहे. साच भूमिकेतून शिवसेनेने युतीसाठी पुढाकार घेतल्याचे बोलले आह जाते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी वाटाघाटी सुरू असलयाची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चामध्ये जागावाटप, स्थानिक नेतृत्वबाचा समन्वय, प्रचार यंत्रणेचे नियोजन तसेच निवडणुकीनंतरचा कारभार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
हे देखील वाचा : अटल बिहारी वाजपेयींनी का नाही केले लग्न? प्रेम केले व्यक्त पण राहिले अपूर्ण…वाचा Love Story
भाजप आणि शिवसेना यांची युती ही केवळ निवडणूक गणितापुरती मर्यादित नसून, नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या राजकीय स्थैयांच्या दूहीनेही महत्त्वाची मानली जात आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या ‘डचल इंजिन’ सरकारचा लाभ नांदेड शहराला मिळावा, यासाठी महापालिकेत सुसंगत नेतृत्व आवश्यक असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मत आहे.
भाजप, सेनेने एकत्र यावे
महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप आणि शिवसेना यांची युती ही केवळ निवडणूक गणितापुरती मर्यादित नसून, नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या राजकीय स्थैर्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. केंद्र आणि राज्यात स्स्तेत असलेल्या ‘डबल इंजिन सरकारचा लाभ नांदेड शहराला मिळावा, यासाठी महापालिकेत सुसंगत नेतृत्व आवश्यक असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मत आहे.
विशेषत पायाभूत सुविधा रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शहरी विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासहती भाजप-शिवसेना एकत्र येणे आवश्यक असल्याचा सूर या चर्चांमध्ये उमटत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत युती झाली पाहिजे आणि हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक लवचिकता दाखवली जात असल्याचे चित्र आहे. मुंबईत सुरू असलेल्या या चर्चांना लवकरच अंतिम स्वरूप मिळेल आणि नांदेड मनपा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा होईल. अशी आशादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. युत्ती साकार झाल्यास नांदेडच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : भाजपच्या निष्ठावंतांना राहिली नाही किंमत? तीव्र विरोधानंतरही पक्षप्रवेश पार, देवयानी फरांदे भावूक
निवडणुकीमध्ये युती झाल्यास शिवसेनेला लाभ होणार
महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा व शिवसेनेची युती झाल्यास शिवसेनेचे सक्षम उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येऊ शकतात अशी शिवसेनेच्या आमदारांची धारणा आहे. हिंदुत्वाच्या मतांमध्ये विभाजन होऊ नये यासाठी प्रदेश स्तरावर युतीची बोलणी यशस्वी झाली तर स्थानिक स्तरावर फारशी अडचण जाणार नाही असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. महानगरपालिकेमध्ये युतीचा फायदा भाजपालाही होत असला तरी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये बंडखोरी होऊ शकते.






