अवैध शस्त्रांविरुद्ध नांदेडमध्ये मोठी कारवाई जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : जिल्ह्यात अवैध अग्निशखांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले असून ७ अग्निशखे, ७६ जिवंत काडतुसे आणि ३ मॅगझिन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत (Crime News) १७आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या आदेशानुसार १ मार्च ते ३० मार्च या कालावधीत नांदेड (Nanded News) शहर व जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. मोहिमेदरम्यान गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा करून तपास करण्यात आला.
अवैध शस्त्र पुरवठा करणाऱ्यांवर विशेष लक्ष
परराज्यातून अवैध शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या टोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते, तपासात उघड झाले की, जप्त करण्यात आलेली पिस्तुले काही सराईत गुन्हेगारांनी स्वत च्या संरक्षणासाठी तसेव मालमत्ते विषयक गुन्हे करण्यासाठी बेकायदेशीररीत्या बाळगली होती. नांदेड पोलिसांनी गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई करत राज्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे, एमपीडीए अंतर्गत डिटेन्शन, तडीपार कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये नांदेड पोलिसांनी आघाडी घेतली आहे.
हे देखील वाचा : विरोधकांच्या टीकेनंतर सोडले मौन; अशोक खरात प्रकरणावर अखेर मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया
प्रिव्हेंटिव्ह कारवाई सेल
‘२ प्लस’ योजनेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी स्वतंत्र ‘प्रिव्हेंटिव्ह कारवाई सेल’ स्थापन करण्यात आला आहे. या सेलमार्फत दररोज आढावा घेऊन गुन्हें रोखण्यावर भर दिला जात आहे. परिणामी, वर्ष २०२५ मध्ये २०२४ च्या तुलनेत मालमत्तेविषयक व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. अवैध शरखे ही समाजासाठी गंभीर धोका असून, पूर्वी नदिडमध्ये अशा घटनांचे प्रमाण अधिक होते. मात्र, गेल्या एक ते दोन वर्षात पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. बहुजिल्हा स्तरावर कारवाई करून शस्त्र पुरवठादार व मध्यस्थांना अटक करण्यात आली आहे. आशु पाटील आणि अनिकेत सूर्यवंशी यांच्यासह ५० पेक्षा अधिक आरोपीवर २एस’ योजनेअंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी
साखळी उद्धवस्त
नांदेड पोलीसांकडून अवैध शस्त्रांची संपूर्ण साखळी उद्धवस्त करण्यासाठी मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असून नियमित कॉम्बिंग व सर्च ऑपरेशन्स राबविण्यात येत आहेत. दरम्यान, नागरिकांनी अवैध शस्त्रांबाबत कोणतीही माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






