Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar News: पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे पण; नेहरू-इंदिरा गांधींच्या योगदानावरून शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

NCP foundation day : "आज देशासमोरील बेरोजगारी, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याकांच्या अनेक गंभीर समस्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांबाबत, त्यांच्या समस्यांबाबत किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे," असा टोला त्यांनी लगावला. काही जणांकडून इतिहास पुण्याचा प्रयत्न होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 10, 2026 | 04:15 PM
भाजपमध्ये जायचे नसेल तर आरपीआयमध्ये या

भाजपमध्ये जायचे नसेल तर आरपीआयमध्ये या

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे- शरद पवार
  • स्वातंत्र्यलढ्यातील नेहरूंचा संघर्ष, तुरुंगवास आणि देशनिर्मितीतील भूमिका कधीही विसरता येणार नाही – शरद पवार
  • पंतप्रधान मोदींची नेहरूंशी तुलना करणे योग्य नाही – शरद पवार
Sharad Pawar NCP Foundation Day: “नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. हे एक घटनात्मक पद आहे. या पदाची प्रतिष्ठा जपणे आवश्यक आहे. मोदी किती वर्षे पंतप्रधान राहिले हा वेगळा विषय आहे, मात्र नेहरूंच्या कर्तृत्वाशी आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.

या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी होणाऱ्या तुलनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “स्वातंत्र्यलढ्यातील नेहरूंचा संघर्ष, तुरुंगवास आणि देशनिर्मितीतील भूमिका कधीही विसरता येणार नाही. तसेच देशाची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा वाढवण्यात इंदिरा गांधींचेही मोठे योगदान आहे. असं शरद पवार यांनी सांगितलं.

सत्तारांच्या मुलाचा गेम ओव्हर! जिल्हा बँक निवडणुकीत ४५ दिग्गज नेत्यांना थेट ‘नो एन्ट्री’; वाचा कोणाकोणाचे अर्ज बाद?

सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका

“आज देशासमोरील बेरोजगारी, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याकांच्या अनेक गंभीर समस्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांबाबत, त्यांच्या समस्यांबाबत किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे,” असा टोला त्यांनी लगावला. काही जणांकडून इतिहास पुण्याचा प्रयत्न होत आहे. पण त स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि काँग्रेसच्या योगदानाचे महत्त्व कमी करू शकत नाही, असंही त्यांनी नमुद केलं.

शरद पवार म्हणाले, “देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले म्हणून त्यांचा गौरव होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण जवाहरलाल नेहरूंचे कार्य आणि कर्तृत्व यांची तुलना इतर कोणाशी करता येईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. नेहरू पंतप्रधान झाले तो काळ देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा होता. तो काळ अनेक अडचणी, आव्हाने आणि संघर्षांनी भरलेला होत. पंतप्रधान मोदींची नेहरूंशी तुलना करणे योग्य नाही.

Chhatrapati Sambhajinagar: ‘कचरा’ करणाऱ्यांची आता गय नाही! चार प्रकारांत वर्गीकरण अनिवार्य;

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चा २७ वा वर्धापन दिन आज राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत पक्षाच्या स्थापनेपासूनच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा गौरव केला. तसेच पक्षाच्या वैचारिक भूमिकेचा पुनरुच्चार करत जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली २७ वर्षांचा प्रवास

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की, १० जून १९९९ रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ पक्षाने देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत सक्रिय योगदान दिले आहे. सुळे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचाराचा उल्लेख करत, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची पक्षाची परंपरा कायम असल्याचे सांगितले.

 

 

Web Title: Narendra modi vs jawaharlal nehru comparison sharad pawar ncp foundation day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • narendra modi
  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; शेतकऱ्यांच्या थकीत पैशांसाठी पाठपुरावा
1

Sharad Pawar : शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; शेतकऱ्यांच्या थकीत पैशांसाठी पाठपुरावा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवण्यावरून वाद; ‘दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्रात सोहळा का नाही?’ राज ठाकरेंचा सवाल
2

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवण्यावरून वाद; ‘दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्रात सोहळा का नाही?’ राज ठाकरेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.