'कोण काय म्हणत मला देणं-घेणं नाही'; छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय? (फोटो - सोशल मीडिया)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जयंत पाटील यांच्याबाबत विचारले असता त्यांनी कोण काय म्हणत मला देणे घेणे नाही. मला फुलेवाडा स्मारक यावर विचारा. कुणीही सिनेमाला विरोध करू नये. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फुलेवाड्याची पाहणी केली, असे म्हटले.
माजी मंत्री भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘माझं भाग्य आहे 25-27 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करायला मिळाले. त्यांच्यानंतर शरद पवारांच्या सारखा नेता मिळाला. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. दोघेही मोठे-मोठे नेते आहेत. दोघांपासून मी शिकलो दोघेही मला आदरस्थानी आहेत’. फुले चित्रपटावर त्यांनी सांगितले की, ‘ त्यांनी मला स्पष्ट सांगितलं अशा प्रकारचे सिनेमांमध्ये थोडं स्वतंत्र घेऊन नाही ते पण दाखवले आहे. फुलेंचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे. तो सिनेमाचा एक भाग आहे. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत’ असे सांगितले.
जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, ‘कोण काय म्हणत मला देणे घेणे नाही. मला फुलेवाडा स्मारक यावर विचारा, कुणीही सिनेमाला विरोध करू नये. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फुलेवाड्याची पाहणी केली. उद्या महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. या निमित्ताने पुण्यातील फुलेवाडा परिसरामध्ये महात्मा फुले यांच्या समाधीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पुण्यातील फुलेवाडा या ठिकाणची पाहणी केली आहे.