Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : अबब! वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी! पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या सविस्तर बातमी

नाशिक शहरातील द्वारका येथे ३० रस्त्यांची व ४ अडाणपुलाची विकास कार्म, दुरुस्ती, रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 30, 2026 | 01:13 PM
Private vehicles in mumbai crosses number of 53 lakhs, Private vehicles in mumbai, Mumbai Traffic, Mumbai News,

Private vehicles in mumbai crosses number of 53 lakhs, Private vehicles in mumbai, Mumbai Traffic, Mumbai News,

Follow Us
Follow Us:
  • अवजड वाहनांसाठी ‘पर्यायच’ नाही
  • वर्षभर शहरवासीय अडकणार वाहतूक कोंडीत
  • पर्यायी मार्ग कोणते?
नाशिक द्वारका येथील ग्रेड सेप्रेटरच्या कामास सुरूवात होईल. इतर कामेही मार्गी लागत असून, लवकरच शहरात वाहतूक कोंडीची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जड अवजड वाहनांना रोखून धरणे शक्य नसल्याने या वाहनांमुळे रहिवाशी भागात कोडीसह अपघाताची भीती आहे. वर्षभर नाशिककरांना जीवमुठीत धरूनच प्रवास करावा लागणार आहे.

शहरात ३० रस्त्यांची व ४ उड्डाणपुलांची विकास कामे, दुरुस्ती, रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यात द्वारका येथील ग्रेड सेप्रेटरचे काम असेल. यासाठी द्वारका चौकात येणाऱ्या मोठ्या वाहनांसह एसटीबसेस, सिटी लिंक बसेसलाही प्रवेश बंद करण्यात आला आहे. शहरातून जाण्यासाठी या वाहनांना फेम थिएटर, पुढे बडाळागाव गाव कलानगर सिग्नल आणि पुढे पाथर्डी फाटा अथवा लेखानगरमार्गे मुंबई नाका असा पर्याय आहे. काही वाहनांना वडाळगावाजवळून साईनाथनगर चौफुली आणि पुढे इंदिरानगर अंडरपास व पुढे मुंबईनाका हा रस्ता देण्यात आला आहे. जाणाऱ्या वाहनांचा ताणही इंदिरानगर जॉगींग ट्रॅक रस्त्याने रवीशंकर मार्ग आणि डीजीपीनगर असा राहिल, जड अवजड वाहनांना दिवसभर शहराबाहेर रोखून धरण्याची व्यवस्था नसल्याने या वाहनांना बसेसबरोबर इंदिरानगर भागातूनच जावे लागेल, कलानगर सिग्नलजवळ मोठ्या वाहनांना पुरेसा टर्निंग रेडीयस नाही. परिणामी येथे वाहतूक कोंडी उद्भवू शकते. इंदिरानगर अंडरपास सुरू झाला तरी हे काम पूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. विशेष म्हणजे या कामासाठी हायवेवरील वाहतूक सहिंसरोडने वळवावी लागणार आहे. बस आणि जड वाहने नसताना मुंबईनाका सकाळ संध्याकाळच्या सुमारास वाहतूक कोंडीत सापडतो.

Nashik News : द्वारकावर अवजड वाहनांसह बसेसला नो एंट्री; असा असेल एसटीला पर्यायी मार्ग

विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

रवीशंकर मार्गपासून पुढे कलानगर असो की साईनाथनगर चौफुली मार्गे मुंबईनाका या भागात शाळा आहेत, शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थ्यांची, वाहनांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे येथील विद्याथ्यर्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा घोक्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी येथून जह वाहतूक सुरू असताना सातत्याने अपघात झालेत. नागरिकांचा रोष वाढल्याने हा मार्ग जह वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

सर्व पर्यायाची चाचपणी केल्यानंतर हे मार्ग ठरवण्यात आले आहे. सध्या तरी त्यास दुसरा पर्याय नाही. आवश्यक त्या ठिकाणी ट्रैफिक वार्डन, वाहतूक पोलिस तैनात करण्यात येतील, त्याची तयारी सध्या सुरू आहे. वाहतूक कोंडी होऊ शकेल अथवा अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त देऊ, अशी प्रतिक्रिया वाहतूक विभागातील सहायक पोलीस आयुक्त अद्विती शिंदे यांनी दिली.

Girish Mahajan News: अनवधानाने नाव राहिले, एवढा वाद कशासाठी?’; गिरीश महाजनांच्या स्पष्टीकरणाने नव्या वादाची ठिणगी

Web Title: Development work including repairs and widening of 30 roads and 4 bridges will begin at dwarka in nashik city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Traffic

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
2

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.