नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर(On Mumbai-Nashik highway) जुन्या कसारा घाटात (Kasara Ghat) मुंबईहून नाशिकच्या(Mumbai-Nashik) दिशेने जात असतांना वाहनावरील ताबा सुटल्याने कोळशाने भरलेला कंटेनर (container) तीनशे फुट दरीत कोसळला. या दुर्घटनेत चालक बचावला असून कंटेनर रेल्वेच्या संरक्षक भिंतींवर अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी मुंबईहून नाशिककडे (Mumbai-Nashik) जात असतांना ट्रक चालक अनिल श्रीकृष्ण रोडे (रा. बीड) हा कसारा घाट (Kasara Ghat) चढतेवेळी हिवाळा ब्रिजच्या अलिकडील वळणावर एका अज्ञात वाहनाने त्यांना ओव्हर टेक केला. त्यावेळी, ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कोळशाने अर्धवट भरलेला ट्रक थेट दरीत जाऊन कोसळला.
[read_also content=”कामठी येथे दरोड्याच्या उद्देशाने फायरिंग करत केली दगडफेक, घटना सीसीटीव्हीत कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/stone-pelting-fired-at-kamathi-with-intent-to-rob-incident-captured-on-cctv-nraa-232531.html”]
कसारा घाटाच्या (Kasara Ghat) खाली ३०० फूट खोल दरी लगत रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गांवरुन नाशिक-मुंबई रेल्वे सेवा सुरु असते. काल सकाळी जो ट्रक दरीत कोसळला तो मोठ्या वेगात खाली दरीत कोसळला होता दरीत कोसळलेला ट्रक रेल्वे ट्रॅक मार्गांवर असलेल्या बोगद्याच्या दगडी भिंतीवर अडकला म्हणून पुढील अनर्थ टळला. जर अजून एक फूट जरी ट्रक पुढे गेला असता तर तो ट्रॅक वरच पडला असता. तसेच सुदैवाने अजून एक घटना टाळावी आहे. हा अपघात झाल्यावर केवळ १० मिनिटांनी या रेल्वे ट्रक वरून मुंबईकडे मेल एक्सप्रेस(Mail Express to Mumbai) रवाना झाली. जर ही मेल एक्सप्रेस व अपघाताची वेळ सारखीच असती तर, रेल्वेच्या कंपनांमुळे ट्रक थेट रेल्वेवर कोसळला असता व मोठी हानी झाली असती.
[read_also content=”नागपुरात महिलेच्या फुप्फुसातून निघाली चक्क लवंग, पाहून डॉक्टरही चक्रावले…. कर्करोगाची शंका https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/in-nagpur-cloves-came-out-of-a-womans-lungs-and-even-the-doctor-got-dizzy-when-he-saw-her-suspicion-of-cancer-nraa-232459.html”]
उडी मारल्याने चालक बचावला
एमएच १५ इव्ही ९८२६ क्रमांकाचा कंटेनरवरील (container) ताबा सुटल्याने तीनशे फुट दरीत कोसळल्याची घटना घडली. रेल्वे बोगद्याच्या संरक्षक भिंतीवर जाऊन हा कंटेनर(container) अडकला होता. तर, कंटेनर (container) चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्याने त्याचे प्राण बचावले आहे. महामार्ग पोलिस घोटी केंद्रची टीम व आपत्ती व्यवस्थापन टीम तसेच रूट पेट्रोलिंग टीमचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात अजून कोणी जखमी झाले असेल तर त्याचा शोध सध्या सुरू आहे.