Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Weather : शेतकरी चिंतेत! उन्हाच्या चटक्यानंतर ढगाळ वातावरण, तापमानाचा पारा ४० वरून ३५ अंशावर

उन्हाच्या तीव्रतेनंतर वातावरणात बदल होत ढगाळ स्थिती निर्माण झाली असून तापमान ४० अंशांवरून ३५ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 20, 2026 | 04:17 PM
शेतकरी चिंतेत! उन्हाच्या चटक्यानंतर ढगाळ वातावरण, तापमानाचा पारा ४० वरून ३५ अंशावर

शेतकरी चिंतेत! उन्हाच्या चटक्यानंतर ढगाळ वातावरण, तापमानाचा पारा ४० वरून ३५ अंशावर

Follow Us
Follow Us:
  • उन्हाच्या चटक्यानंतर ढगाळ वातावरण
  • तापमानाचा पारा ४० वरून ३५ अंशावर
  • शेतकरी चिंतेत
मनमाड (वा.) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले असतानाच, हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि ग्रामीण परिसरात दाट ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ४० अंशांच्या पार गेलेला तापमानाचा पारा थेट ३५ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. या बदलामुळे नागरिकांना वाढत्या उष्म्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

होळीनंतर उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावल्याने पारा ३२ अंशांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट आली आणि तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला होता. सकाळी ११ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत होता. विशेषतः पत्र्याच्या घरात राहणाऱ्या कष्टकऱ्यांचे उकाड्‌याने प्रचंड हाल होत होते. आता आकाशात काळे ढग दाटून आल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली असून रविवारी पारा ३५ अंशांपर्यंत खाली आला आहे.

Nanded News : महिला आरक्षण गेलं खड्डयात..; भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ना खंत ना खेद

वातावरणाच्या लपंडावामुळे आंबा, डाळिंबांना फटका

हवामानातील हा लपंडाव सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला, तरी बळीराजासाठी मात्र चिंतेची बाब ठरत आहे. कधी कडक ऊन, तर कधी अवकाळी पाऊस आणि आता ढगाळ वातावरण, अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आंबा आणि डाळिंब बागांना या ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसू शकतो. मोहोर गळणे किवा फळावर डाग पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कांदा आणि गहू काढणीच्या हंगामात असतानाच हवामान बदलल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, रविवार, १९ ते २१ एप्रिल दरम्यान किनारपट्टीवरील महाराष्ट्रात, म्हणजेच कोकण प्रदेशात, हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. या काळात मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाचे सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या काळात किनारपट्टीवरील रहिवासी आणि मच्छिमारांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे समुद्रातील हालचालींवर परिणाम होऊ शकतो.

पावसाचा सार्वजनिक जीवनावर परिणाम

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशात २३ एप्रिलपर्यंत अधूनमधून पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचे वारे सुरू राहण्याची शक्यता आहे. या भागांतील हवामानात सतत बदल होत राहतील, ज्यामुळे सामान्य जीवन आणि शेती या दोन्हींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

BMC News: मुंबई महानगरपालिकेतील बदली प्रक्रियेवर गंभीर आरोप; वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Web Title: Temperature drop cloudy weather relief heat wave news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • heatwave
  • maharashtra
  • Weather Update

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.