डोंबिवली : मध्यरात्री भरस्त्यात हुक्का पार्टी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डोंबिवली येथील स्टेशन परिसराच्या हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली. नवराष्ट्रने ही बातमी केल्यानंतर खडबडुन जागा झालेल्या पोलीस प्रशासनाने हुक्का पार्टी करणाऱ्या अक्षय पवार या तरुणाला अटक केली आहे तर दोन आरोपींच्या पोलीस शोधात आहे.
सुसंस्कृत सुशिक्षित अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसून येतेय. डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात एक तरुण भर रस्त्यात हुक्का पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होता. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारासचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात होते. दरम्यान या घटना स्थळापासून काही मिनटावर डोंबिवली पोलीस स्टेशन,एसीपी कार्यलय आहे . रात्रीच्या सुमारास स्टेशन परिसरात पोलिसांची गस्त सुरू असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो .हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांचा हा दावा फोल ठरल्याचे दिसून आला. त्यामुळे नागरिकांची सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. नवराष्ट्र ने बातमी केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून हुक्का पार्टी करणाऱ्यांचा शोध सुरू झालं व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका तरुणाला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर उर्वरित दोन तरुणांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.. अक्षय पवार असं अटक करण्यात आलेला तरुणाचे नाव आहे. हुक्का पिणारा सुरज साळुंखे व त्याचा मित्र पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .