कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे लोकोपयोगी विषय व नागरी समस्या या बाबत महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे (Municipal Commissioner Dr Bhausaheb Dangde) यांच्या सोबत कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी अर्बन सेलच्या (KDMC NCP Urban Cell) वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वसुविधायुक्त सुसज्ज रुग्णालय (Well Equipped Hospital) होणे का गरजेचे आहे हे अर्बन सेल महाराष्ट्र प्रदेश सदस्य व कल्याण-डोंबिवली अर्बन सेल अध्यक्ष प्रविण मुसळे यांनी आयुक्तांना चर्चेच्या माध्यमातून पटवून दिले. या बैठकीला कल्याण डोंबिवली अर्बन सेलचे विविध विषय समितींचे समन्वयक अमोल लांडे, अमित खोत, उमेश घाडगे, प्रसाद संगीत हे उपस्थित होते.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या मूळच्या कल्याणच्या त्याच शहरामध्ये आरोग्य सेवेची ही अवस्था का ? स्मार्ट सिटीची दिव्य स्वप्न साकारताना आरोग्यासाठी सेवा म्हणून आनंदीबाई जोशी यांच्या नावे सुसज्ज अत्याधुनिक सरकारी रुग्णालय होणे हीच खरी स्मार्ट गरज आहे. १ ऑक्टोबर १९८३ साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना होऊन २०२३ उजडले असले तरी रूक्मिणीबाई व शास्त्रीनगर रूग्णालयावर रूग्ण सेवेची मदार असून सन २०११ च्या जनगणनेनुसार १५.१८ लाख लोकसंख्या असलेले हे महाराष्ट्रातील ७ वे मोठे शहर आहे.
[read_also content=”Cannes 2023: सनी लिओनच्या कान्स मधल्या ‘त्या’ अदा पाहून चाहते झाले तिच्यावर ‘फिदा’ https://www.navarashtra.com/web-stories/after-seeing-sunny-leone-killer-look-performance-in-cannes-2023-fans-were-fida-on-her-katil-ada-nrvb/”]
वाढते नागरीकरण व वाढती लोकसंख्या पाहता अत्याधुनिक आणि सुसज्ज आरोग्य सुविधांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. चांगले आरोग्य हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. कल्याण-डोंबिवली मनपाची रूग्णालये संख्या ३ असून मनपा रुग्णालयाची खाटा संख्या २९० इतकी सदयस्थितीत आहे. वाढती लोकसंख्या सुमारे २० लाखांवर गेली आहे. मनपाची रूग्णालय संख्या पाहता आरोग्य सेवा किती कमी आहे हे चित्र दिसून येत आहे. यामुळे काळाची गरज पाहता कळवा रुग्णालय, मुंबईकडील सरकारी रूग्णालयात रूग्णांना पाठविणे थांबविले गेले पाहिजे. स्मार्ट सिटीची दिव्य स्वप्न साकारताना आरोग्यासाठी सेवा म्हणून सुसज्ज अत्याधुनिक सरकारी रूग्णालये हीच खरी स्मार्ट गरज असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रविण मुसळे यांनी दिली.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 25 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-25-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]