मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एका कार्यक्रमात बोलताना “मी कधी-कधी येथे महाराष्ट्रातील लोकांना सांगतो की, महाराष्ट्रातून गुजराती आणि राजस्थानी (Gujarati and Rasthani peoples) लोकांना काढून टाका, म्हणजे मुंबईत (Mumbai) पैसा राहणार नाही…मग मुंबईला आर्थिक राजधानी (econimis capital) हे म्हणताच येणार नाही…” असं राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) केल्यानंतर याचे काल आणि आज दिवसभर महाराष्ट्रात पडसाद पाहयला मिळत आहेत. सध्या राज्यपालांविरोधात निषेध आंदोलन (protest) व टिकेची झोड उठत आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP youth congress) भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात “जोडे मारो आंदोलन” करत राज्यपालांचा निषेध करण्यात आला.
[read_also content=”मद्याबाबत दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, जुनेच मद्य धोरण लागू होणार https://www.navarashtra.com/india/old-liquor-and-wine-policy-will-be-done-by-delhi-government-310116.html”]
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तमाम मराठीजनांबद्दल अवमानित वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे अडव्होकेट अमोल मातेले (Advocate amol matele) यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर परिसरात आज “जोडे मारो आंदोलन” करून “चले जाओ” चा नारा देण्यात आला. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात जपुन बोलण्याचा संकेत आहे, परंतु महामहीम राज्यपाल वारंवार महाराष्ट्राचा अवमान करीत आहेत.
या निषेध आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. अडव्होकेट अमोल मातेले यांनी राज्यपालांच्या प्रतिमेला जोड्याने मारून चले जावच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घाटकोपर कार्याध्यक्ष अन्वर दळवी, उपाध्यक्ष केशव काळे, दिलीपराव सातपुते, राहुल टिकेकर, प्रशांत कालेकर, राजेंद्र ढवळे, कुतुब आलम आणि हनीफ पटेल, शैलेश यादव व इमरान तडवी शेकडोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेवून निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांना अमोल मातेले यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.