• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • New Twist In Malegaon Blast After 17 Years Who Is Making Big Revelations

Malegaon Blast Case Verdict: १७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटात नवा ट्विस्ट! कोण करतोय मोठे खुलासे?

एटीएसचा सुरूवातीचा तपास बनावट होता. या प्रकरणाच्या तपासात काही गंभीर त्रुटी होत्या. एटीएसने एका विशिष्ट अजेंडाखाली काम केले, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 01, 2025 | 01:50 PM
Malegaon Blast Case Verdict:  १७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटात नवा ट्विस्ट! कोण करतोय मोठे खुलासे?

१७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटात नवा ट्विस्ट! कोण करतोय मोठे खुलासे?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Malegaon Blast Case Verdict:  नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 2008 साली रमजानच्या आदल्या भिक्कू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर 100हून अधिक लोक जखमी झाले. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल लागला असून, या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पण या प्रकरणाची चौकशी कऱणाऱ्या माजी एटीएस अधिकाऱ्याने एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना गोवण्याचा प्रयत्न कऱण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर मेहबूब मुजावर कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेले महाराष्ट्राचे माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी दावा केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामागे देशात ‘भगवा दहशतवादा’ची संकल्पना स्थापन करण्याचा उद्देश होता. जो पूर्णपणे खोटा होता, असेही मुजावर यांनी म्हटले आहे.

Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला होणार निवडणूक

एटीएसचे माजी अधिकारी मेहबूब मुजावर यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. न्यायालयाच्या निर्णयावरून हे सिद्ध होते की, एटीएसचा सुरूवातीचा तपास बनावट होता. या प्रकरणाच्या तपासात काही गंभीर त्रुटी होत्या. एटीएसने एका विशिष्ट अजेंडाखाली काम केले, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या स्फोटाची चौकशी करणाऱ्या पथकात आपण देखील सामील होतो. या स्फोटात सहा लोक मृत्यूमुखी पडले तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. नंतर, प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले.

मोहन भागवत यांना अटक करणे माझ्या क्षमतेबाहेर होते – मेहबूब मुजावर

मुजावर म्हणाले की, त्यावेळीम मला काही अत्यंत गोपनीय आदेश मिळाले होते, ज्यात मोहन भागवत, राम कलसंगरा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांच्यासारख्यांची नावे होती. या आदेशांना कोणताही कायदेशीर किंवा तार्किक आधार नव्हता. “मी त्या आदेशांचे पालन केले नाही कारण सत्य काहीतरी वेगळे होते,” ते म्हणाले.

ठरलं! प्राजक्ता गायकवाडने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

भागवतांसारख्या व्यक्तिमत्त्वाला अटक करणे माझ्या क्षमतेबाहेर होते, पण मी  त्यांच्य आदेशांचे पालन केले नाही. त्यामुळए त्यांच्याविरुद्ध खोटा खटला दाखल करण्यात आला, ज्यामुळे त्यांची ४० वर्षांची पोलिस कारकीर्द उद्ध्वस्त झाली, असा आरोपही मुजावर यांनी यावेळी केला. मुजावर यांनी त्यांच्या दाव्यांना समर्थन देण्यासाठी कागदोपत्री पुरावे असल्याचा दावाही केला. “कोणताही भगवा दहशतवाद नव्हता, ते सर्व दावे खोटे होते.अलीकडील न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले आहे की या प्रकरणाच्या तपासात काही लोकांना जबरदस्तीने गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.

कोण आहेत मेहबूब मुजावर?

मेहबूब मुजावर यांच्या कुटुंबाचा पोलिस खात्याशी खोल संबंध आहे. महाराष्ट्रातील सोलापूर येथील रहिवासी असलेले महबूब मुजावर यांचे वडील अब्दुल करीम हे पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले. त्यांचे आजोबा दुसऱ्या महायुद्धात लढले. नंतर त्यांनी महाराष्ट्र पोलिसातही सेवा बजावली. अशाप्रकारे महबूब मुजावर यांचे कुटुंब दोन पिढ्यांपर्यंत पोलिसांशी जोडले गेले. मुजावर १९७८ मध्ये महाराष्ट्र पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. १९८३ मध्ये ते अधिकारीपदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पोलिस उपनिरीक्षक झाले. १९८४ मध्ये त्यांना साताऱ्यात उपनिरीक्षक म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. मुजावर यांचे कुटुंब बरेच श्रीमंत आणि सुशिक्षित आहे. त्यांना तीन मुले आणि दोन मुली आहेत. महबूब मुजावर यांची सर्व मुले डॉक्टर आहेत.

९ वर्षांपूर्वीही खळबळ उडाली

मेहबूब मुजावर यांनी सुमारे ९ वर्षांपूर्वी एक दावा करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. हा दावा मालेगाव बॉम्बस्फोटाशीही संबंधित होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक असलेले मेहबूब अब्दुल करीम मुजावर यांनी २०१६ मध्ये एक खळबळजनक खुलासा केला होता आणि दावा केला होता की २००८ च्या मालेगाव हल्ल्यातील दोन संशयितांना आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (महाराष्ट्र एटीएस) ठार मारले होते. तथापि, त्यांच्या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही. ‘हिंदुस्तान टाईम्स’मधील वृत्तानुसार, मुजावर यांचे सहकारी त्यांच्यावर संशय घेत होते. मुजावर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना निलंबितही करण्यात आले होते.

Web Title: New twist in malegaon blast after 17 years who is making big revelations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • Malegaon Bomb Blast Case
  • mohan bhagwat
  • RSS

संबंधित बातम्या

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
1

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
2

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा
3

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

PM Modi ON RSS 100 : राष्ट्र साधनेची 100 वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा RSS च्या शतकपूर्तीवर खास लेख
4

PM Modi ON RSS 100 : राष्ट्र साधनेची 100 वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा RSS च्या शतकपूर्तीवर खास लेख

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.