"आरक्षण संपवण्याची कोण भाषा करत असेल तर छातीचा कोट करुन उभा राहीन", नितेश राणेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल
( भगवान लोके ) कणकवली : राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून गेलं आहे. देशभरात याचे तीव्र पडसाद उमटत असतानाच कणकवलीत महायुतीकडून आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली. आमदार नितेश राणे म्हणाले की, आरक्षण बचाव रॅली ही काय राजकीय रॅली नाही .मात्र विरोधी पक्षनेते , राहुल गांधी अमेरिकेत जाऊन देशातील आऱक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. म्हणून ही रॅली महायुतीकडून काढण्यात आली आहे. देशातील आरक्षण संपवण्याची कुणीही हिंमत करु शकणार नाही. राहुल गांधीना लोकसभेत झालेले मतदान पाहून अहंकार चढला आहे. त्यामुळेच कॉंग्रेस सत्तेवर आल्यास आऱक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. परंतु आंबेडकरी जनतेला आम्ही विश्वास देतो की , आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष आणि देशात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. तोपर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकत नाही. मी या भागाचा आमदार म्हणून आरक्षण संपवण्याची कोण भाषा करत असेल, तर छातीचा कोट करुन आपल्या सोबत उभा राहीन, असा विश्वास आ. नितेश राणे व्यक्त केला.
हेही वाचा- मुंबई मेट्रो लाईन 3 चे मोदींच्या हस्ते लोकार्पण, बीकेसी मेट्रो स्टेशनवरुन दाखवला हिरवा झेंडा
कणकवली येथील आरक्षण बचाव रॅली जानवली पुल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महायुतीच्या वतीने काढण्यात आली. यावेळी बौध्द विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आ. नितेश राणे म्हणाले , लोकसभा निवडणूकीत मोदी सरकार आले तर , संविधान संपवणार असा खोटा प्रचार विरोधकांनी आंबेडकरी जनतेच्या वाडी , वस्त्यांवर जावून केला. त्यात काही मुंबईतील कार्यकर्ते देखील प्रचार करत होते. परंतु राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा या लोकांनी कुठेही निषेध केलेला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान बदलणार अस वक्तव्य केलं असेल तर असा एकतरी पुरावा दाखवा. 2024 मध्ये लोकसभेत कॉंग्रेसला भोळ्या-बाबड्या लोकांनी मतदान केलं त्यामुळे राहुल गांधीमध्ये अहंकार चढला आहे. राहुल गांधींची चे भाषण पहावे ,देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जेव्हा मी सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवून टाकेन असे बोलत आहेत.आरक्षण रॅली बचाव आटपून घरी जात असताना नक्की विचार करा.आरक्षणामुळे समाजामध्ये बसण्याचा आणि भाषण करायचा अधिकार आपल्याला मिळाला आहे. हे विसरुन चालणार नाही.
हेही वाचा- बारामतीत प्रहार संघटना आक्रमक; अजित पवारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन
आरक्षण बचाव रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित आहात,काँग्रेस नेते राहुल गांधी आरक्षण संपवून टाकू,असे वक्तव्य करतात,त्याची दखल आरक्षण बचावासाठी आम्ही घेतली आहे.आपण राजकीय रॅली काढली असे नाही.आता लोकसभेला मतदान केलं,आता विधानसभा आणि त्यानंतर जिल्हापरिषद आणि पंचायत समिती साठी मतदान करणार आहोत. मतदान करीत असताना विचार केलं पाहिजे. कॉग्रेस नेते राहूल गांधीने वक्तव्य केलं तेच मोदी यानी केलं असत तर आरक्षण गेलं म्हणून सांगण्यासाठी वाड्या – वस्त्यांवर आले असते.लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपा सत्तेवर आले तर हक्काचे संविधान ते बदलणार असे सांगितले.आपण त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला. नरेंद्र मोदी यांनी 400 पार ची आपण घोषणा का दिली ? केंद्रात स्थिर सरकार असेल तर हक्काचे निर्णय घेवू शकले असते.2014 ते 2024 कालावधी स्थिर सरकार दिल्याने देशात चांगल्या योजना राबविण्यात आल्या.कधीतरी त्याचा विचार आपण केला पाहिजे. असेही नतिश राणे म्हणाले.