मुंबई : ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या रविवारी ४ सप्टेंबर रोजी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक (Mega block) राहणार नाही. सेंट्रल रेल्वेने (Central Railway ) याबाबतची माहिती दिली आहे. सध्या गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022)असल्याने मुंबईकर बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. रविवारी शासकीय सुट्टी आहे. लोक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतील, याचा विचार करुन मध्य रेल्वेने सगळ्या लाईन्सवरचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. (Central Railway Mega Block)
No Mega block on 04.09.2022 (Sunday) @drmmumbaicr .
For information please. pic.twitter.com/RWwBS4JsV9
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) September 2, 2022
दर रविवारी रेल्वेलाईनवरील कामे पूर्ण करण्यासाठी किंवा दुरूस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो. मात्र या रविवारी गणेशोत्सव असल्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वेने घेतला आहे. ट्विटद्वारे रविवारी मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक नसेल याबाबतची माहिती दिली आहे.
[read_also content=”‘रुप नगर के चीते’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/entertainment/roopnagar-ke-cheetey-trailer-launch-nrsr-321826/”]
मुंबईकरांना दर रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहावं लागतं. कारण रेल्वेकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. परंतु या रविवारी यातून मुंबईकरांना दिसाला मिळाला आहे.