मुंबई : राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर जवळ-जवळ वरच्या फळीतील मोठे मोठे मातब्बर नेते निघून गेले होते. त्यानंतर जे काही राष्ट्रवादीत महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते राहिले होते, त्यामध्ये सोनिया दुहान यांचा नंबर अग्रेसर होत्या. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीला झटका बसला आहे. कायम शरद पवारांच्या सोबत असणाऱ्या सोनिया दुहान यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.
#WATCH | Mumbai: On resigning from NCP-SCP, Former NCP-SCP Student Union President, Sonia Duhan says, "I haven’t left Sharad Pawar nor I have left the party…I don’t know who is spreading these rumours….I have not joined the party of Ajit Pawar…Supriya Sule should think about… pic.twitter.com/I9Ws0b2fy0
— ANI (@ANI) May 28, 2024
सोनिया दुहान यांनी पक्ष सोडल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी पक्ष सोडल्याच्या चर्चेवर माध्यमांना स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत, पक्षातील समस्या समोर मांडल्या आहेत. पक्षात सर्व काही सुरळीत नाही, तसेच जेष्ठ नेते का सोडून जात आहेत, यावर विचार करायला हवा. सुप्रिया सुळेंमुळे मला पक्ष सोडवा लागणार, असल्याचा धक्कादायक खुलासा सोनिया दुहान यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शरद पवार गटला मोठा झटका बसला आहे.
सुप्रिया सुळेंनी विचार करायला हवा
सुप्रिया सुळे आमच्या लिडर बनू शकल्या नाहीत. मी अजूनपर्यंत पार्टी सोडली नाही. मी शरद पवार साहेबांच्या सोबत आहे. तरी सुप्रिया सुळेंच्या जवळची लोकं आम्हाला पक्ष सोडण्यासाठी मजबूर करीत आहेत. आम्ही अजूनही कोणत्या पक्षाला जॉईन, करणार नाही. सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या म्हणून ठिक, परंतु त्या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. हे सुप्रिया सुळेंनी याचा विचार करायला पाहिजे. मी अजितदादांच्या पक्षात गेलेले नाही की भाजपामध्ये गेलेली नाही. शरद पवार यांच्याशी अनेक दशके जोडलेले नेते पक्ष का सोडत आहेत. याचा विचार सुप्रिया सुळेंनी करायला हवा.