Olympic Medalist Swapnil Kusale Felicitated by CM Eknath Shinde : ऑलिम्पिक पदक जिंकून आल्यानंतर प्रथमच मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. स्वप्नीलचे मार्गदर्शक व कुटुंबियांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बक्षिसाच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत मागणी केली आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावर गणेशोत्सवानिमित्त स्वप्नील कुसाळेंने गणपतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपरणे परिधान करून स्वप्नील कुसाळेंला गौरवान्वित केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाला स्वप्नील कुसाळेचा सत्कार
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दर्जेदार कामगिरी केल्यानंतर कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे याची आणि मुख्यमंत्र्यांची पहिलीचे भेट होती. त्यानंतर स्वप्नील व मार्गदर्शक अष्टपुत्रे यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्धा तास चर्चा केली. यावेळी तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्रासाठी पदक जिंकल्याबद्दल राज्य शासनाच्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ करावी, पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी बालेवाडी स्टेडियमजवळ सदनिका मिळावी ही मागणी त्यांचे कुटुंबिय व मार्गदर्शक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.
प्रशिक्षकांसह कुटुंबीयांनी केली मागणी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर थ्री पोझीशन नेमबाजीत कांस्यपदकाचा पराक्रम करणार्या स्वप्नील कुसाळे यांच्या बक्षिसाच्या रक्कमे वाढ करून त्यांना सर्व सुविधा देण्याबाबत शासन कटिबध्द असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. कल्याणमधील शूटिंग रेजच्या भेटीचे निमंत्रण खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वप्नील कुसाळेंला देत आवश्यक सुविधांसाठी शासन पाठबळ देईल असे आश्वासन देण्यात आले आहे.