माघी गणेशोत्सव निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी मंगळवारी चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील गणेश मंदिरांना सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी त्यांचे स्थानिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते व वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव गणेश मंदिरांना सदिच्छा भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले.
यामध्ये मांडकी – खांबेवाडी, धामणवणे पिटलेवाडी, खेंड चौकी, श्री गणेश मंदिर उक्ताड, महालक्ष्मी सोसायटी खेंड, युनिटी क्रीडा मंडळ पाग, खेर्डी चिलेवाडी, नवगणेश मित्र मंडळ पिंपळी तीनवड, रिक्षा चालक-मालक संघटना पेढांबे, जय गणेश मित्र मंडळ गणेशवाडी कुंभार्ली, श्री गणेश मंदिर वालोपे गणेशवाडी आदी गणेश मंदिरांना भेटी दिल्या. यावेळी येथील ग्रामस्थ व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशांत यादव यांच्यासह उपस्थितांचे स्वागत केले.
तसेच संगमेश्वर आणि देवरुख परिसरातील गणेश मंदिरांना सदिच्छा भेट दिली. यामध्ये तुरळ हरेकरवाडी धामणी गवळवाडी, कडवई ओकटेवाडी विकास नगर, श्री सिद्धिविनायक हरिहरेश्वर मंदिर शिवणे, बाजारपेठ मित्र मंडळ देवरुख, श्रद्धा सबुरी मित्र मंडळ देवरुखवासी, श्री सिद्धिविनायक बाल मित्र मंडळ देवरुख, श्री देव गणपती ओझरेखुर्द, श्री गणेश सेवा मंडळ आरवली, श्री देव गणपती मंदिर सेवाभावी मंडळ माखजन येथील गणेश मंदिरांना सदिच्छा भेट देत गणरायाचे आशीर्वाद घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश ऊर्फ बारक्याशेठ बने, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, देवरुखचे शहराध्यक्ष निलेश भुवड, पंचायत समितीचे माजी उपसभापती छोट्या गवाणकर, क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, महिला तालुकाध्यक्ष दीपिका किर्वे, तुरळचे माजी सरपंच शंकर लिंगायत, प्रकाश कुंभार, माजी युवा सेना तालुका प्रमुख मुन्ना थरवळ, ओझरे गट उपविभाग प्रमुख संदीप धावडे, कुंडीचे सरपंच लोकम, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सरचिटणीस अल्ताफ जेठी आदी उपस्थित होते.