डोंबिवलीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्पोर्ट मध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा जीव गेला आहे. 60हुन जास्त लोक जखमी आहेत. जखमींवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. जखमींना रक्ताची गरज आहे. हॉस्पिटल प्रशासनांकडून विविध सामाजिक संघटना यांना रक्तासाठी आवाहन केले गेलं होतं. या आवाहनला महेश गायकवाड यांनी प्रतिसाद देत कल्याण पूर्वेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हा रक्तदान शिबिर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला आहे.
कल्याण-मातोश्री गुंजाई फाऊंडेशनच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागात रक्तदान शिबीराचे आयोजन आज केले होते. या शिबीरात १०० जणांनी रक्तदान केले. डाेंबिवली एमआयडीसीमधील अमूदान स्फाेट प्रकरणात ६४ जण जखमी झाले. त्यावेळी अनेकांनी रक्ताची गरज भासली. ही गरज लक्षात घेता हे रक्तदान शिबीर पार पडले.
[read_also content=”महाडच्या चवदार तळ्यावर जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचे दहन: वादग्रस्त श्लोकांचा वाचला पाढा https://www.navarashtra.com/maharashtra/jitendra-awhad-aggressive-to-burn-manusmriti-attended-by-thousands-of-workers-at-chavdartal-mahad-nrpm-539893.html”]
या प्रसंगी शहर प्रमुख गायकवाड यांनी सांगितले की, डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अमूदान कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत बरीच हानी झाली. १२ जणांचा मृत्यू झाला तर ६४ जण जखमी झाले. या घनटेनंतर अनेकांना रक्ताची गरज भासली. रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी मातोश्री गुंजाई फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजन केले होते. त्याला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. १०० जणांनी रक्तदान करुन आराेग्यविषयक सामाजिक बांधिलकी जपली आहे. मातोश्री गुंजाई फाऊंडेशने यापूर्वीही अनेक वेळा रक्त दान शिबीर आयोजन केलेले आहे. कोरोना काळातही रक्ताची गरज भासली होती. तेव्हा रक्तदान शिबीर आयोजन करुन अनेकांना रक्त उपलब्ध करुन दिले आहे.