कसा आला प्रकार समोर ?
बारकुल्या नावाची चाळ सुमारे तीस वर्ष जुनी असून येथे दहा ते पंधरा कुटुंबे वास्तव्यास आहेत. या चाळीतील पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून वापरात नव्हती. सध्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने बंद असलेली पाण्याची टाकी तोडण्याचे काम सुरु होते. यावेळी टाकी तोडत असतांना आतमध्ये मानवी कवटी तसेच हाताच्या काही हाडांचे सांगडे आढळून आले.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनेची माहिती मिळताच तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांकडून टाकी परिसरात आणखी मानवी अवशेष आहेत का, याचा सखोल शोध घेतला जात आहे.
हत्या की अंधश्रद्धेचा?
या प्रकरणाला काही नागरिकांकडून अंधश्रदेचा प्रकार असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही नागरिकांकडून ही हत्या करून मृतदेह या ठिकाणी टाकला असावा असा संशय व्यक्त करत आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. मृतदेह किती जुना आहे, मृत व्यक्तीची ओळख काय आणि मृत्यूचे नेमके कारण काय? या सगळ्याचा सखोल तपास पोलीस करत आहे. या घटनने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आता आणखी काय समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
मंदिरात मंगळसूत्र बांधून लग्नाचा भास; वसईत अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर POCSO कारवाई
वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवत एका अल्पवयीन शालेय मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. पीडित मुलीची एका सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणाशी मैत्र झाली होती. आरोपीने तिला विरारच्या जीवदानी मंदिरात नेऊन, तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. “आपले लग्न झाले आहे’ असा भास निर्माण केला आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी तरुणावर पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Ans: नौपाडा येथील बारकुल्या चाळीतील बंद पाण्याच्या टाकीत.
Ans: इमारतीच्या दुरुस्तीवेळी टाकी तोडत असताना अवशेष सापडले.
Ans: मृतदेह किती जुना आहे, ओळख व हत्या की अंधश्रद्धेचा प्रकार याचा तपास सुरू आहे.






