फोटो सौजन्य: गुगल
वसई । रविंद्र माने : नालासोपऱ्यात खंडणीप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर आणि त्याच्या तीन साथीदारांना पोलीसांनी अटक केली आहे. माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर आणि त्यांचे तीन साथीदार बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता यांच्यावर माहिती अधिकाराखाली अर्ज टाकून ब्लॅकमेल करत होते. त्यामुळे या बिल़्डरने खंडणीची तक्रार दाखल केली.
बिल्डर गुप्ता यांनी सांगितलं की, वरळी येथील बांधकाम प्रकल्पासह बांदेकर आणि त्याचे साथीदार हिमांशू शहा,किशोर आणि निखिल यांनी एसआरए प्रकल्पांशी संबंधित विविध विभागांमध्ये अनेक आरटीआय अर्ज दाखल केले होते. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.हे सर्व अर्ज थांबवण्यासाठी या चौकडीने 10कोटी रुपयांची मागणी माझ्याकडे केली.त्यानंतर त्यांच्यासोबत अनेकदा चर्चा करुन दिड कोटी रुपयांवर तडजोड झाली.अशी तक्रार बिल्डर गुप्ता यांनी नवघर पोलीस ठाण्यात केली होती.या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे पोलीसांना दिसून आले.त्यानंतर सापळा रचून पोलीसानी १५ लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बांदेकर आणि त्यांच्या साथीदारांना मीरा रोड- नवघर परिसरातील एका हाॅचेलमध्ये बोलावले होते.
Phone tapping news: एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून फोन टॅपिंग..?; खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ
मात्र, माघी गणपतीत व्यस्त असल्याचे कारण देवून बांदेकरांनी पैसे घेण्यासाठी हिमांशू शहाला पाठवले आणि पैसे घेताना तो पोलीसांच्या जाळ्यात अडकला.त्यानंतर पहिला हप्ता मिळाल्याचे संकेत हिमांशूने बांदेकरला दिले.त्यावेळी ते आचोळे-नालासोपारा पुर्व येथे घेवून येण्यास बांदेकरने हिमांशुला सांगितले.त्यामुळे पोलीसांनी शनिवारी रात्री आचोळे येथे येवून बांदेकरसह त्याच्या इतर साथीदारांच्या मुसक्या आवळल्या.या सर्वांना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी मागितली जाणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
बांदेकर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात ३०८(२), ३०८ (३) ३०८ (४), ३५२, ३५१(२) ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.स्वप्नील बांदेकर यांनी अनेक जणांविरोधात माहिती अधिकाराचे अर्ज करुन त्यांना त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे.त्यामुळे त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.त्यातून बांदेकरांच्या लबाडीचे आणखी प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.बांदेकर हा शिवसेनेचा नगरसेवक म्हणून मागील खेपेस निवडून आले होते.शिवसेना फुटीत त्यांनी उध्दव ठाकरे गटात राहणे पसंत केले होते, असं सांगितलं जात आहे.