६० एकर जमीन अतिक्रमणमुक्त (फोटो- सोशल मीडिया)
कालव्यावरील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई
धरण परिसरातील १०० एकर जमीन अतिक्रमणमुक्त
नागरिक व पर्यावरणप्रेमींनी वारंवार केल्या होत्या तक्रारी
पुणे: खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यानच्या कालव्यावरील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाने धडक कारवाई करत आतापर्यंत सुमारे ९० टक्के अतिक्रमणे हटविल्याचा दावा केला आहे. या कारवाईमुळे कालव्यालगतची सुमारे ५० ते ६० एकर, तर खडकवासला धरण परिसरातील सुमारे १०० एकर जमीन अतिक्रमणमुक्त झाल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
खडकवासला धरण परिसरात वाढत्या अतिक्रमणाबाबत नागरिक व पर्यावरणप्रेमींनी वारंवार तक्रारी केल्यानंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीच्या कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाने संपूर्ण धरण परिसर व कालव्याचा ड्रोन सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. त्यातून धरण परिसरात तब्बल २३ अतिक्रमणे असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, संभाव्य कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी न्यायालयात कॅव्हेटही दाखल करण्यात आली होती. मात्र, रहिवासी अतिक्रमणांबाबत प्रशासनाने तुलनेने सावध भूमिका घेतली आहे.
जलाशय पातळीतील अतिक्रमणे अद्याप तशीच
पूर्ण संचय पातळीच्या (जलाशय पातळी) आत येणाऱ्या दोन ते चार ठिकाणांवरील अतिक्रमणे अद्याप हटविण्यात आलेली नाहीत. या ठिकाणीही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. अतिक्रमणमुक्त झालेल्या जमिनीमुळे कालव्याची वहनक्षमता वाढण्यासह पाणीपुरवठा आणि पर्यावरण संरक्षणाला मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनधिकृत प्लॉटिंगला बसणार आळा! PMRDA ची पुरंदरमध्ये धडक कारवाई; नागरिकांची फसवणूक होत असल्याने…
पुणे महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अाॅनलाईन सुविधा उपलब्ध केल्याने यावेळी निवडणुकीत इच्छुकांना तुलनेत कमी त्रास सहन करावा लागला. अर्जदारांना ३ हजार ७८३ ना हरकत प्रमाणपत्रे देण्यात अाली हाेती. महापालिकेने इच्छुक उमेदवारांसाठी आॅनलाईन प्रणालीद्वारे एकूण ४१ खात्यांना जोडून, उमेदवारांचा अर्ज एकावेळी सर्व खात्यांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी लिंक केले होते. हे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आॅनलाईन प्रणालीद्वारे एकूण ४०५७ अर्ज प्राप्त झाले. एकूण प्राप्त अर्जापैकी २७४ अर्ज खात्याच्या शिफारशीनुसार बाद करण्यात येऊन ३७८३ अर्जदारांना आॅनलाईन ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. तर पुणे महानगरपालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्राच्या संकेतस्थळाला ६,९८,४८५ नागरिकांनी संपर्क साधला.
पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसागठी प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत प्रथमच आॅनलाईन यंत्रणा अंमलात आणण्यात आली आहे. मागील निवडणुकीमध्ये भरपूर मनुष्यबळ लागत होते आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब होत होता. यामुळे विहित कालमर्यादेत ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे यासाठी महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ साठी थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांसाठी खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.
Pune News: खडकवासला धरणक्षेत्रात रिसॉर्ट, हॉटेल मालकांची धावपळ; कुडजे परिसरातील…
विशेष म्हणजे या कक्षाद्वारे सरासरी २४ तासांच्या आत नाहरकत वितरित करण्यात आल्या. विशेष म्हणजे शेवटच्या २ दिवसांत सरासरी ४ तासांत या संगणक प्रणालीमध्ये ना-हरकत देण्यात आल्या. इच्छुक उमेदवारांची दमछाक कमी करण्यासाठी या संगणक प्रणालीचा चांगला उपयोग झाला असल्याच्या प्रतिक्रिया बहुतांश अर्जदारांनी दिल्या आहेत.






