माथेरान शहरातील कचरा डेपोचा प्रश्न निकाली काढणाऱ्या मुख्याधिकाऱ्याच्या कार्याचा लोकांना विसर
माथेरान शहरात दोन वर्षे पालिका मुख्याधिकारी म्हणून कार्य करताना रामदास कोकरे यांनी शहरातील कचरा डेपोचा प्रश्न निकाली काढला होता. शहारातील कचरा डेपो मध्ये 50 वर्षाचा हजारो टन कचरा हा तेथून काढून आणि प्रसंगी माथेरान शटल मिनी ट्रेनचा वापर करून नेरळ येथे नेण्यात आला आणि त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शहरातील कचरा डेपो खुले मैदान आणि एक पर्यटन स्थळ बनले. दरम्यान मुख्याधिकारी यांच्या कार्याची दखल घेऊन माथेरान नगरपरिषद यांनी कचरा डेपो कडे जाणाऱ्या मार्गाला मुख्याधिकारी रामदास कोकरे मार्ग असे नामकरण करण्यात आले.मात्र त्या नामफलकाची दुरवस्था झाली असून माथेरान पालिकेला याबाबत कोणतीही माहिती नाही.
माथेरान मध्ये वाहनानं बंदी असल्याने वर्षानुवर्षे साठून राहिलेला कचरा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.त्या साठलेल्या कचऱ्याचे करायचे काय? हा प्रश्न राज्यातील डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याचे निर्मूलन करून शून्य कचरा विरहित डम्पिंग ग्राउंड ही संकल्पना राबविणारे रामदास कोकरे यांनी माथेरान पालिका मुख्याधिकारी म्हणून जानेवारी 2018 मध्ये जबाबदारी स्वीकारल्यानंतर माथेरानमध्ये शून्य डम्पिंग ग्राउंड हि संकल्पना राबविण्यास सुरुवात केली.
Tata ची सर्वात स्वस्त कार झाली महाग, जाणून घ्या कोणत्या व्हेरियंटची किती वाढली किंमत
माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारताच वर्षानुवर्षे साठून राहिलेला कचरा प्रश्न हाती घेतला आणि त्यासाठी संपूर्ण पालिका प्रशासन सहकार्य करेल असे आश्वासन थेट नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दिले होते. त्यानुसार माथेरान येथील कचरा कर्जतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे नेण्यास सुरुवात झाली आहे. डम्पिंग ग्राउंड कचरा मुक्त करण्यासाठी माथेरान मधून कचरा पालिका कर्मचारी बॅग मध्ये भरून मिनीट्रेन आणि हातगाड्या मधून कचरा माथेरान बाहेर काढण्याचे नियोजन केले आहे. त्याचवेळी मालवाहतूकदार यांना तो कचरा कर्जत किंवा नेरळ येथे नेण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.
या सर्व वाहतुकीच्या साधनांचा वापर करून माथेरानच्या डम्पिंग ग्राउंड मधील कचरा नेरळ आणि तेथून माथेरान असा नेला आणि माथेरानचा डम्पिंग ग्राउंड कचरा मुक्त केला. 50 वर्षाचा कचरा तेथून हटविण्यात आल्यानंतर माथेरान शून्य कचरा डेपो असलेले शहर बनले असून त्या शून्य कचरा डेपोची माहिती घेण्यासाठी अभ्यासक माथेरान ला भेटी देत आहेत,त्याचवेळी माथेरानला आलेले पर्यटक देखील खास भेट देत असतात. त्यामुळे माथेरान मधील पर्यटन स्थळांच्या यादीत शून्य कचरा डेपो हे आणखी एक पर्यटन स्थळ बनले आहे. माथेरान हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून प्रदूषणमुक्त शहर म्हणून माथेरान कडे पाहिले जात होते आता तर स्वच्छतेमध्ये माथेरान नगर परिषदेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
उकळत्या उन्हात इंजिनची ओव्हरहीटिंग काही केल्या थांबेना ! अशाप्रकारे कारची घ्या काळजी
स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविताना 2020 मध्ये माथेरान हे डम्पिंग मुक्त शहर म्हणून घोषित झाले आहे. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या कार्याची दखल घेऊन माथेरान पालिकेने त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पालिकेचे सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन शून्य कचार डेपो पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याला मुख्याधिकारी रामदास कोकरे रस्ता असे नाव दिले. या चौकाचे नामकरण मोठ्या उत्सहात माथेरान पालिकेने रायगड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि विद्यमान कोकण महसूल आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले होते.