फोटो सौजन्य: iStock
उन्हाळ्याच्या दिवसात अनेकदा आपल्याला विशेष खबरदारी द्यावी लागते. पण ज्याप्रमाणे या सीझनमध्ये आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे कारची देखील काळजी घ्यावी लागते. अनेकदा या सिझनमध्ये बाईक आणि कारचे इंजिन तापले जाते. यामुळे कारमध्ये आग लागण्याची देखील भीती असते.
भारतातील अनेक भागात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. अशावेळी, केवळ आपल्यावरच नाही तर कार्सवरही विपरीत परिणाम होत असतो. वाढत्या उष्णतेमुळे कारच्या इंजिनांच्या अति तापण्याची समस्याही वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत जर कारची योग्य काळजी घेतली नाही तर ती जास्त गरम होण्याबरोबरच इतर अनेक समस्यांना आमंत्रित करू शकते. म्हणूनच आज आपण उन्हाळ्यात कार जास्त गरम होण्यापासून वाचवण्यासाठी काही उपाययोजनांबद्दल जाणून घेणार आहोत.
Bajaj Platina 110 चा नवीन व्हेरियंट मार्केटमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी
जेव्हा एखादी कार बराच वेळ सतत चालते आणि तिला थंड होण्यास वेळ मिळत नाही तेव्हा तिचे इंजिन गरम होऊ लागते. यासोबतच, जर इंजिन थंड ठेवणारा कुलंट कमी झाला किंवा संपला तर इंजिन जास्त गरम होऊ लागते.
जेव्हा तुमच्या कारचे इंजिन जास्त गरम होते, तेव्हा तुमच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमधील तापमान मीटरची सुई वेगाने वर येऊ लागते. यासोबतच कारमधील एसी आणि इतर सिस्टीम व्यवस्थित काम करत नाहीत. जर इंजिन जास्त गरम झाले तर वाहन थांबू शकते आणि इंजिनमधून धूर देखील येऊ शकतो.
सुरक्षित ठिकाणी कार थांबवा: जर इंजिन जास्त गरम होत असेल आणि तुम्हाला जास्त गरम होण्याची चिन्हे दिसत असतील, तर तुम्ही सुरक्षित ठिकाणी कार थांबवा. जास्त गरम झालेल्या इंजिनसह कार चालवल्याने तुमचे आणि कारचे गंभीर नुकसान होऊ शकते.
रेडिएटर कॅप उघडू नका: सुरक्षित ठिकाणी कार पार्क केल्यानंतर तुम्ही कधीही रेडिएटर कॅप उघडण्याचा प्रयत्न करू नये. खरंतर, यामुळे प्रेशरने गरम कुलंट बाहेर पडू शकते.
लिकेज चेक करा: इंजिन जास्त गरम होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कूलंट लीकेज. जर तुम्हाला तुमच्या कारमधून कुठूनतरी कुलंट गळत असल्याचा संशय आला तर चांगल्या मेकॅनिककडून कार तपासा.