अनिश्चित पाऊस आणि कर्जामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत (फोटो - सोशल मीडिया)
डॉ. गंगाधर तोगरे : कंधार : निसर्गाचा लहरीपणा, नापिकी आणि कर्जबाजारी आदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आपले जीवन आत्महत्या करून संप विण्याचा मार्ग पत्करला. नांदेड जिल्ह्यात २४ डिसेंबर २०२४ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती जिल्हास्तरीय कार्यालयाच्या प्राप्त प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यातील लोहा तालुक्यात १९ व हदगाव तालुक्यात १७ अशी संख्या आहे.
जिल्ह्यातील काही मोजक्या तालुक्याचा अपवाद वगळता शेती निसर्ग पावसाच्या लहरीपणावर मोठ्या प्रमाणात विसंबून आहे. पावसाचा खंड पडला की पीकांचे पोषण व वाढ होत नाही.
अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्यास पीकाचे अतोनात नुकसान होते. पाऊस योग्य झाला अन् पीकाचा उतारा चांगला आला तरी मालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत, लागवड, संगोपन, काढणी, मळणी आदीवर झालेला खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नाही. मग शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कळीत होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, पाल्याचे शिक्षण, लग्न आदीचा खर्च भागवायचा, कसा? कर्जफेड करायची कशी? आर्थिक चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांनी करायचे काय ? अशा नानाविध विचारांचे काहूर निर्माण होते आणि नैराश्यातून आपले जीवन विषारी औषध प्राशन करून, गळफास घेऊन, रेल्वेखाली पडून विजेच्या तारेला पकडून, विहीर, नदी, तलावात उडी मारून आदीने शेतकरी आत्महत्या करतो. जिल्हयात १४५ शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२४ ते ३० ऑक्टोबर २० २५ या कालावधीत आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गळफास घेऊन, रेल्वेखाली पडून विजेच्या तारेला पकडून, विहीर, नदी, तलावात उडी मारून आदीने शेतकरी आत्महत्या करत आहे. जिल्हयात १४५ शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२४ ते ३० ऑक्टोबर २० २५ या कालावधीत आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील १४५ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणात समितीने ८३ प्रस्ताव पात्र ठरविले आहेत. आणि ८ प्रस्ताव अपात्र केले आहेत. प्रलंबित असलेले प्रस्ताव ५४ असल्याचे समजते. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या केलेली सर्वाधिक संख्या लोहा तालुक्यात १९ असून हदगाव तालुक्यात १७ संख्या आहे. जिल्ह्यात सर्वात कमी संख्या धर्माबाद तालुक्यात अवधी १ आहे. आणि उमरी ३ व देगलूर तालुक्यात सुद्धा ३ संख्या आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मन्याडखोऱ्यात २६ शेतकऱ्यांची आत्महत्या
मन्याडखोरे बालाघाट डोंगराच्या नैसर्गिक टेकड्या, माळरानावर कंधार व लोहा तालुका वसलेला आहे. निसर्ग शेतीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. निसर्ग अति पावसामुळे शेती पीकाचे नुकसान होते. तसेच कमी पावसाने पीक वाढ, उतारा योग्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडते. आणि आर्थिक चणचणीने शेतकरी आर्थिक चक्रव्यूहात अडकून शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होतो. अशा नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो. त्यामुळे मन्याडखोऱ्यातील लोहा तालुक्यात १९ व कंधार तालुक्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.






