बारणेंसह पराभूत उमेदवारांच्या विरोधात सुधारित याचिका दाखल
मावळ लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 33 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या 14 उमेदवारांचा तर 19 उमेदवारांचा समावेश होता. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांना 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली होती तर प्रतिस्पर्धी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना (उबाठा) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना 5 लाख 96 हजार 217 मते मिळालेली होती. 96 हजार 615 मतांनी बारणे यांनी मताधिक्य घेतलेले होते. मात्र मावळ लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि मतमोजणीत आलेले मतदान यामध्ये 573 मतांची तफावत आहे.
हेदेखील वाचा- घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या याचिकेवर उद्या मुंबई हाय कोर्टात सुनावणी
याप्रकरणी अपक्ष उमेदवार अॅड. राजू पाटील यांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मात्र मावळ लोकसभा निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका प्रवेशापुर्वीच तांत्रिकदृष्ट्या त्रुटीवर आक्षेप घेऊन फेटाळण्यात आली आहे. या याचिकेत सुधारणा करून निवडणूक आयोग व खासदार बारणे यांच्यासह सर्व पराभूत उमेदवारांच्या विरोधात सुधारित याचिका मुंबई उच्च न्यायालयात पराभूत अपक्ष उमेदवार अॅड. राजू पाटील यांनी अॅड. पूजा कलाटे यांच्यातर्फे दाखल केली आहे. याप्रकरणी 10 सप्टेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 33 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या 14 उमेदवारांचा तर 19 उमेदवारांचा समावेश होता. या 19 अपक्षांमध्ये अॅड. राजू पाटील यांचा समावेश आहे. त्यांना या निवडणुकीत 32 व्या क्रमाने केवळ 670 मते मिळाली. त्यामध्ये एकमेव पोस्टल मताचा समावेश आहे. मावळ लोकसभा निवडणुकीत एकूण 14 लाख 19 हजार 655 मते ग्राह्य धरण्यात आलेली असून पोस्टल 254 मते अवैध ठरवण्यात आली.
हेदेखील वाचा- कुडाळमधील हळदीचे नेरूर फुटब्रीज पुलाला भगदाड; 7 वाड्यांच्या संपर्क सुटला
तर नोटाला एकूण 16 हजार 760 मते दिलेली आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांना 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली होती तर प्रतिस्पर्धी दुसऱ्या क्रमांकावरील ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना 5 लाख 96 हजार 217 मते मिळाली. 96 हजार 615 मतांनी बारणे यांनी मताधिक्य घेतलेले होते. असे असताना मावळ लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि मतमोजणीत आलेले मतदान यामध्ये 573 मतांची तफावत आहे. इतकी तफावत येऊ नये असा आक्षेप याचिकाकर्ते व अपक्ष उमेदवार अॅड. राजू पाटील यांनी घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस आयुक्त, संजोग वाघेरे पाटील यांच्यासह सर्व उर्वरीत उमेदवारांना प्रतिवादी केलेले आहे. अॅड. राजू पाटील यांनी निवडणूक आयोगासह संबंधित सर्वच उमेदवारांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. अॅड. राजू पाटील यांनी दिनांक 12 जुलै 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र प्रवेशातच तांत्रिकदृष्ट्या त्रुटीवर आक्षेप घेऊन 25 जुलैला ही याचिका फेटाळण्यात आली. याचिकेत सुधारणा करून त्यांनी पुन्हा दाखल केलेली याचिका 30 जुलैला प्राथमिक प्रवेशावर स्विकारण्यात आली. मात्र याचिकेतील उर्वरीत त्रुटी दूर करण्याचे आदेश देत न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी 10 सप्टेंबरला ठेवली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेसंदर्भात अनेक त्रुटी असल्याचे दाखल प्रवेशातच म्हटलं होतं. यामध्ये सारांश अपूर्ण असणे, मागणी व मुद्दे, म्हणणे व्यवस्थित नाहीत, काही पृष्ठे अनुक्रमा गहाळ असणे, प्रत्येक पानावर याचिकाकर्त्याची स्वाक्षरी नसणे, व सत्यापित न करणे, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 83 (अ) नुसार संलग्न करण्यात येणाऱ्या तथ्यांचे संक्षिप्त विवरण नसणे, कलम 83(c) तरतुदीनुसार भ्रष्ट व्यवहाराच्या आरोपाच्या समर्थनार्थ जोडले जाणारे प्रतिज्ञापत्र आणि त्याचे तपशील नसणे, लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत उच्च न्यायालयाने तयार केलेल्या नियम 25 नुसार खर्चासाठी देय असलेली सुरक्षा ठेव कार्यालयात जमा न करणे या सर्व कारणामुळे याचिका फेटाळण्यात आली होती.
राजू पाटील यांनी स्वतः वकील असल्याचं निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. त्यांनी शिक्षणाविषयी अपूर्ण माहिती दिली आहे. कोणत्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले हे नमूद केलं नसून केवळ पुणे विद्यापीठ एलएलबी 2022 इतकेच नमूद केलं आहे. तर लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी 33 हजार 421 खर्च झाल्याचं निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अंतिम अनुसूचित नमूद केलं आहे. दरम्यान याचिकाकर्ते अॅड. पूजा मारुती कलाटे या राजू पाटील यांच्या पत्नी आहेत. याबाबत निवडणूक प्रतिज्ञापत्रात अॅड. पाटील यांनी तसं नमूद केलं आहे. उपरोक्त याचिका त्यांच्या तर्फे दाखल करण्यात आलेली आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे. त्याची तक्रार प्रशासन आणि पोलिसांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. 1988 मध्ये असा प्रकार झाला होता. त्यावेळी त्या आमदाराची आमदारकी रद्द करण्यात आली होती. ही सर्व उदाहरणं याचिकेत दिले आहेत. मात्र यासंदर्भात उच्च न्यायालयातील वकीलांचे मत जाणून घेतले असता त्यांनी सदर आव्हान याचिका तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. मोघम आरोपांच्या आधारावर निवडणूक प्रक्रियेतील दोषांवर बोट ठेवणं सिद्धतेसाठी पुरेसं नसते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीवर या याचिकेचा कोणताही परिणाम होणार नाही.