कुडाळमधील हळदीचे नेरूर फुटब्रीज पुलाला भगदाड
कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथील फुटब्रिज जवळील पूलाला मध्यभागीच भलं मोठं भगदाड पडलं आहे. हा पुल गावातील 7 वाड्यांना जोडतो. मात्र आता पुराच्या पाण्यामुळे या पुलाला भलं मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळे 7 वाड्यांचा संपर्क तुटला आहे. वाड्यांचा संपर्क तुटल्याने नागरिकांचे हाल सुरू आहे. येथील रहिवासी उर्वरित वाड्यांपासून वेगळे पडले आहेत. त्यांना प्रवासासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ हळदीचे नेरूर येथील फुटब्रिज जवळील पूलाची दुरुस्ती करून तो पूल वाहतुकीस खुला करावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हेदेखील वाचा- घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या याचिकेवर उद्या मुंबई हाय कोर्टात सुनावणी
कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यातील फुटब्रिज पुलाच्या पलीकडे हळदीचे नेरूर गावामधील मधलीवाडी, देऊळवाडी, सुतारवाडी, कुंदनवाडी, हरिजनवाडी, पाल व मळई असा गावाचा अर्धा भाग वसला आहे. 22 वर्षांपूर्वी या ठिकाणी लोकांची बारमाही वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून कमी उंचीचा पूल बांधण्यात आला होता. मात्र गेल्या तीन-चार वर्षात ठीकठिकाणी या पुलाच्या स्लॅबला भेगा पडत होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेत श्रमदानातून पुलाच्या भेगा बुजवल्या. मात्र यंदा या भागात जोरदार पाऊस झाला त्यामुळे आलेल्या पुरात पुलाला भलं मोठं भगदाड पडलं. पूलाच्या मध्यभागील स्लॅपचा 90 टक्केभाग नदीपात्रात कोसळून पडला आहे. हे भलं मोठं भगदाडं ग्रामस्थांना दुरुस्त करणं अवघड आहे, त्यामुळे शासनाने आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ हळदीचे नेरूर येथील फुटब्रिज जवळील पूलाची दुरुस्ती करून तो पूल वाहतुकीस खुला करावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हेदेखील वाचा- हेदुटणे, उत्तराशीव मधील जमीन हस्तांतरणास मनसेचा विरोध; गुरुचरण जागा रुग्णालयासाठी आरक्षित करण्याची राजू पाटलांची मागणी
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून कुडाळ तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गावातील काही नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. ह्या पुरात 22 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुराचा स्लॅब कोसळला. त्यामुळे 7 वाड्यांचा संपूर्क तुटला आहे. फुटब्रिज पुलाच्या पलीकडे हळदीचे नेरूर गावामधील मधलीवाडी, देऊळवाडी, सुतारवाडी, कुंदनवाडी, हरिजनवाडी, पाल व मळई असा गावाचा अर्धा भाग वसला आहे. ह्या 7 वाड्यांना गावात जाण्यासाठी फुटब्रिज पुलाचा वापर करावा लागतो. मात्र आता पुलाला भलं मोठं भगदाड पडल्याने ग्रामस्थांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकांची बारमाही वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी 22 वर्षांपूर्वी या ठिकाणी कमी उंचीचा पूल बांधण्यात आला होता. मात्र गेल्या तीन-चार वर्षात या पुलाच्या स्लॅबला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवून पुलाला पडलेल्या भेगा बुजवल्या. मात्र यंदा आलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील नद्यांना पुर आला आणि या स्लॅबचा 90 टक्केभाग नदीपात्रात कोसळून पडला. हा भला मोठा भाग दुरुस्त करणं ग्रामस्थांच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. त्यामुळे शासनाने आपत्कालीन व्यवस्थेमधून हळदीचे नेरूर येथील फुटब्रिज जवळील पूलाची दुरुस्ती करून तो पूल वाहतुकीस खुला करावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.