पुणे : साैंंदर्यशास्त्र उपचार पद्धतीच्या क्षेत्रात माेठी राेजगार आणि उत्पन्नाची संधी वाढत आहे. त्यादृष्टीने या क्षेत्राला प्राेत्साहन देण्याची गरज आहे. त्याला अनुसरुन मनुष्यबळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे मत ‘आयटुकॅन’ या शिक्षण संस्थेचे संचालक नंदन गिजरे यांनी ‘काॅफी विथ नवराष्ट्र’ या चर्चेत मांडले.
मुळात आयटी इंजिनिअर असणारे गिजरे यांनी ‘आयटी’ क्षेत्रातील माेठ्या कंपन्यांमध्ये काम केले. परदेशातही नाेकरी केली. परंतु आपल्या काैशल्याचा अधिक फायदा हा दुसऱ्याला हाेत आहे, याच काैशल्याचा उपयाेग आपण स्वत:साठी का करू नये ? हा विचार त्यांच्या मनात आला. ‘आयटी’ क्षेत्र साेडून त्यांनी स्वत:ची कंपनी सुरु करण्याचे ठरविले. काय करावे ? काेणता व्यवसाय निवडावा ? असे प्रश्न निर्माण झाले. काहीतरी युनिक असे मनात हाेते, त्यांचे वडील, आई, चुलते, आत्या या शिक्षण क्षेत्राशीच निगडीत हाेते. ताेच वारसा पुढे चालविण्याचा निर्णय त्यांनी घेतला, साैंदर्यशास्त्र, उपचार पद्धती आणि आहार या क्षेत्रात संधी असल्याचे दिसून आले. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी २०१६ साली त्यांनी ‘इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ काॅस्मेटाॅलाॅजी, एस्थेटिक्स अॅंड न्युट्रीशिअन ’ (आय २ कॅन) या संस्थेची स्थापन केली. आजपर्यंत साडे तीन हजाराहून अधिक जणांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये डाॅक्टर आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे, असे गिजरे यांनी सांगितले.
या क्षेत्रात पंधरा टक्के वाढ
गिजरे म्हणाले, साैंदर्यशास्त्र, उपचार पद्धत, आहार विषयक क्षेत्रात परदेशात जेवढी उलाढाल हाेते. त्या तुलनेत आपण खुप मागे आहाेत. इतर देशांचा विचार करता, या क्षेत्रातील उलाढाल ही आपल्याकडे वीस टक्के कमी आहे. अलीकडील काळात या क्षेत्रातील उलाढाल ही वाढत आहे, दरवर्षी साधारणपणे पंधरा टक्के वाढ हाेत आहे. आयटी क्षेत्राच्या तुलनेत ही वाढ खूप जास्त आहे. याचा विचार करणे आवश्यक आहे. साैंदर्याच्या दृष्टीने चेहऱ्याच्या, दात, त्वचा, केसांवरील उपचारासंदर्भात आपल्याकडे अधिक सजगता किंवा जागरुकता हाेऊ लागली आहे. यामुळे या क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर व्यवसाय, राेजगाराची संधी निर्माण हाेत आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करणे गरजेचे आहे, असे गिजरे यांनी नमूद केले.
तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यास प्राधान्य
या क्षेत्रात काम करणारे डाॅक्टर आणि इतर व्यक्तींना नवीन तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. नवीन उपकरणे, मशिनरी बाजारात येत असतात. त्यांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन त्यांना मिळणे गरजेचे असते. ते मार्गदर्शन आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना देत असताे. अर्थातच हे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ डाॅक्टर आम्ही नियुक्त केले आहे. संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या या पंधरा ‘व्हाेकेशनल काेर्स’करीता आवश्यक ती मान्यता आम्ही घेतलेली आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात विविध शाखांच्या शिक्षणासाठी एक नियमावली, मार्गदर्शक सुची आहे, परंतु या क्षेत्रासाठी अशा प्रकारची काेणतीही नियमावली, मार्गदर्शक सुची नाही. ती तयार हाेणे आवश्यक आहे.
काेराेना कालावधीत प्रशिक्षणार्थी वाढले
२०१६ साली ही संस्था सुरु केल्यानंतर ती स्थिरस्थावर हाेत असतानाच, काेराेनाचे संकट संपुर्ण जगावर काेसळले. या संकटात प्रशिक्षणाचे काम बंद पडेल, असे वाटत असतानाच, आयटी क्षेत्रात केलेल्या कामाचा मला फायदा झाला. लाॅकडाऊनच्या कालावधीत काेर्सेस ‘ऑनलाईन ’ पद्धतीने चालू ठेवण्यात मला यश आले. आयटीत काम करीत असल्याने ‘ऑनलाईन’ साठी आवश्यक अॅप, माेबाईल, लॅपटाॅप आदींचा वापर कशा पद्धतीने करता येताे, हे मला अवगत हाेते. हेच ज्ञान मी आमच्या संस्थेतील डाॅक्टरांना दिले. त्याचा उपयाेग झाला. याच काळात डाॅक्टरांकडून काेर्स करण्याचेही प्रमाण वाढले. त्याचा मला संस्था अधिक आर्थिक सक्षम करण्यास उपयाेग झाल्याचे गिजरे यांनी नमूद केले.
नवीन काेर्सेस आणणार
या क्षेत्रात झपाट्याने बदल हाेत आहे. त्वचा, चेहरा, दात आदी…विषयी तसेच वेट लाॅस, वेट गेन बाबतही नवीन तंत्रज्ञान येत आहे. जीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे काही प्रश्न निर्माण हाेत आहे. साैंदर्याविषयी महीलांप्रमाणेच पुरुष ही जागरुक हाेत असुन, चेहरा, शरीरावरील अनावश्यक केस काढणे, केस राेपण करणे आदी उपचार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यासर्व बदलांंचा विचार आम्ही सातत्याने करीत असताे. त्यानुसार आम्ही न्युट्रीिशअन काेर्सेस आणणार आहाेत. हा काेर्स सर्वसामान्य व्यक्ती करू शकणार आहे. चाईल्ड न्युट्रीिशअन, डायबेिटस डायट, सायकॅट्रीक न्युट्रीिशअन, गायनाकाॅलाॅजी न्युट्रीशिअन असे विविध प्रकारचे काेर्सेस आम्ही सादर करणार आहाेत, असे गिजरे यांनी सांगितले.