PKL 11 : हरियाणा स्टिलर्सचा पाटणा पायरेट्स संघावर शानदार विजय; पिछाडी भरून काढीत ४२-३६ ने दिली मात
पुणे : पिछाडीवर असतानाही कोणत्याही दडपण न घेता उत्कृष्ट अष्टपैलू खेळ करीत हरियाणा स्टीलर्स संघाने पाटणा पायरेट्स संघाला ४२-३६ असे हरविले. प्रो कबड्डी लीग घ्या या सामन्यात मध्यंतराला पाटणा संघाकडे १७-१६ अशी केवळ एक गुणाची नाममात्र आघाडी होती
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन सभागृहात या स्पर्धेत हरियाणा संघाने 16 सामन्यात 13वा विजय नोंदवला. यामध्ये हरियाणाच्या शिवम पटारे याने 11, मोहम्मदरेजा शादलूइने 9 आणि संजय याने 5 गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, पाटणा संघाकडून देवांकने 13 गुण मिळवले.