Photo Credit- Social media
नंदुरबार: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. दुसरीकडे महायुतीमध्येही राज्यस्तरापासून स्थानिक पातळीवरही अनेक घडामोडींना वेग आला आहे.महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असताना नंदुरबारच्या राजकारणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नंदुरबारच्या शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच, असा घोषणा करत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. पण त्याच माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या बंडखोरीचे निशाणही फडकवले आहे.
राजेंद्रकुमार गावित यांच्या या भूमिकेमुळे मात्र आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढणार आहे. राजेंद्रकुमार गावित हे डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. राजेंद्रकुमार गावित य़ांची निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही उमेदवारीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती. पण त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही. पण आता त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
हेही वाचा: मोठी बातमी ! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देणार राजीनामा
तळोदा तालुक्यातील बोरद येथे शहादा तळोदा मतदार संघातील राजेंद्र कुमार गावित यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राजेंद्रकुमार गावित म्हणाले, “ तालुक्यातील सहकार तत्वावरील अनेक प्रकल्प सध्या बंद असल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना रोजगारासाठी परराज्यात जाण्याची वेळ आली आहे.
रोजगार शोधण्याची वेळ मतदार संघातील नागरिकांवर आल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व मतदार संघातील मूलभूत समस्यांच्या पाढा वाचला.अनेक नागरिकांना कर्जमाफीचे पैसे मिळालेले नाहीत. ज्या योजना सुरू आहेत, त्यांचा लाभ मिळण्यातही उशीर होत आहेत. इतकेच नव्हे तर मतदारसंघातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासाला चालना देणार आमदार हवा,अशी कार्यकर्त्यांनी भावनिक साद घातली. त्यामुळे शहादा-तळोदा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारचष अशी ठाम भूमिका राजेंद्रकुमार गावित यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: निवडणुकीपूर्वी जम्मू-कश्मीरात काहीतरी मोठं घडणारं? पूंछमध्ये अडकला दहशतवाद्यांचा कमांडर,पाहा व्हिडीओ