Rahul Gandhi (Photo Credit- X)
Rahul Gandhi on BJP-RSS: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवार, भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) लडाखच्या लोकांवर, संस्कृतीवर आणि परंपरांवर हल्ला करत आहेत, असे म्हणत त्यांनी लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची जोरदार मागणी केली आहे. राहुल गांधींची ही प्रतिक्रिया लेहमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर आली आहे.
राहुल गांधींनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत म्हटले की, “लडाखच्या अद्भुत लोकांनो, संस्कृती आणि परंपरांवर भाजप आणि आरएसएस हल्ला करत आहेत.” ते पुढे म्हणाले, “लडाखच्या लोकांनी आपला आवाज उठवला, त्याला उत्तर म्हणून भाजपने चार तरुणांना ठार मारले आणि सोनम वांगचुक यांना तुरुंगात टाकले. हत्या थांबवा, हिंसाचार थांबवा, धमकावणे थांबवा. लडाखला त्याचा आवाज द्या, त्यांना सहाव्या अनुसूचीचा अधिकार द्या.”
Ladakh’s amazing people, culture, and traditions are under attack by the BJP and RSS. Ladakhis asked for a voice. The BJP responded by killing 4 young men and jailing Sonam Wangchuk. Stop the killing.
Stop the violence.
Stop the intimidation. Give Ladakh a voice. Give them… — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 28, 2025
Rahul Gandhi News: राहुल गांधी परदेश दौऱ्याावर; चार देशांना देणार भेटी, Congressने दिली माहिती
लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीनुसार संरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, बुधवार, २५ सप्टेंबर रोजी निदर्शकांना हिंसक वळण लागले. यात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चार आंदोलकांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. या प्रकरणी, राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी लेहमध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेपूर्वीच ताब्यात घेऊन राजस्थानमधील जोधपूर कारागृहात ठेवण्यात आले आहे.
हिंसाचारग्रस्त लेहमध्ये रविवार, २८ सप्टेंबर रोजी सलग पाचव्या दिवशी कर्फ्यू लागू आहे. उपराज्यपाल कविंदर गुप्ता हे निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सुरक्षा आढावा बैठक घेतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, शनिवारी लेहमध्ये कर्फ्यूमध्ये चार तासांची सूट देण्यात आली होती. या आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर, लडाख प्रशासनाने लेह जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही खंडित केली आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द करून जम्मू आणि काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्यात आली. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ अंतर्गत, माजी जम्मू आणि काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले: जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, जम्मू आणि काश्मीरला विधानसभेसह केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले, तर लडाखला विधानसभेशिवाय केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. या बदलाचा एक भाग म्हणून, गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये एक नवीन विधानसभेची स्थापना करण्यात आली. दरम्यान, राज्याच्या पुनर्रचनेसह, लडाखमध्ये संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची आणि त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी निर्माण झाली. विविध वेळी निदर्शने करण्यात आली आणि या मागण्यांवरील नवीनतम निदर्शनांमध्ये हिंसाचार उसळला.