नालासोपाऱ्यात तीन दिवसांपासून बत्ती गुल! 800 हून अधिक संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर
नालासोपाऱ्यातील लक्ष्मीनगर,विजयनगर, रहमत नगर भागात दोन दिवसापासून वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे मध्यरात्री 3 च्या सुमारास 800 हून अधिक संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी लोकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. महावितरणचे कर्मचारी नागरिकांचा फोन उचलत नसल्याचं सांगत. अनेकांनी रस्ता अडवला. संतप्त महिलांनी रस्त्यावरच पोलिस प्रशासनाला धारेवर धरले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलवा अन्यथा रस्ता सोडणार नाही, असा इशाराच दिला.
टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना ! एकनाथ शिंदेंची उबाठावर खरमरीत टीका
गेल्या अनेक दिवसापासून नालासोपाऱ्यातील अनेक भागात मध्यरात्री लाईट बंद केली जाते.महावितरणचे कर्मचारी कामाचे नाव लाईट गेल्याच सांगतात. मात्र तीन चार भागात सोडून इतरत्र विरार, वसई भागात लाईट सुरळीत असते. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्रीच जाग येते का? असा सवाल संतप्त नागरिकांनी विचारला आहे. मध्यरात्री महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सकाळी ५ वाजेपर्यंत लाईट सुरळीत सुरू करू असे आश्वान देण्यात आले होते. मात्र ९ वाजून गेले तरी लाईट आलेली नाही. त्यामुळे कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय रात्री अपरात्री लाईट काढून महावितरणचे कर्मचारी नागरिकांना वेठीस का धरतायत? हा खरा सवाल आहे. दिवसभर विजेच्या संदर्भातील कामे करण्यास महावितरण कर्मचारी का पुढे सरसावत नाहीत? हा ही प्रश्न आहेच. राजकीय पुढारी अद्याप महावितरणला प्रश्न विचारत नाहीत?
धारावी प्रकल्पाला विरोध अन् उद्धव ठाकरेंना शिवसेनेने व्यंगचित्रातून दाखवला आरसा! सोशल मीडियावर वादळ…
काही वर्षांपूर्वी याच भागात अशाच पद्धतीने वीज पुरवठा खंडित केला जात होता. तेव्हा संतप्त नागरिकांनी महावितरणचे विजय नगर येथील कार्यालयाची तोडफोड केली होती. आता पुन्हा प्रशासनाला नागरिकांना वेठीस धरून घटनेची पुनरावृत्ती घडवून आणायची आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशाप्रकारे कुठलीही घटना घडली तर जनतेच्या प्रश्नांना उत्तर न देणारे महावितरणचे कर्मचारीच याला जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिलीय. कारण महावितरणने अद्याप नागरिकांना कुठलीही सूचना दिलेली नाही. लोक रस्त्यावर उतरल्यावर पोलिस ठाण्यात महावितरणचे कर्मचारी नागरिकांना समजावण्यास बसले. अखेर रात्री ३.३० वाजता नागरिकांनी पोलिस स्टेशन गाठलं. मात्र अद्याप समस्या सुटलेली नाही. ज्यामुळे महावितरणच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न निर्माण केला जातोय.






