वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना डिवचले असून, वंचितकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर फोटो ट्वीट करीत प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला प्रणिती शिंदे यांच्याकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना डिवचले आहे. “तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?”, असा सवाल वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचित बहुजन आघाडीने ट्विटरवर प्रणिती शिंदे यांचा भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत निशाणा साधला आहे.
दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी
“आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित–बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो”, असे वंचित बहुजन आघाडीने ट्विटरवर म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान
“गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झाले होते, जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो, डॅमेज करतो त्यामुळे कोणीही निवडून येत नाही. ज्यामुळे जो विरोधात आहे, तो निवडून येतो म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका”, असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी काल केले होते. यावरून वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
वंचित बहुजन आघाडीने नेमकं काय म्हटलंय?
“ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा. तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?”, असा खोचक सवाल वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांना केला आहे.
Web Title: Praniti shindes photo from vanchit bahujan aghadi goes viral targeted by placing photo on bjp poster read in detail nryb