बंगळुरू: बंगळुरू येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. डॉक्टर पतीनेच केली डॉक्टर पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. डॉक्टरने आपल्या पत्नीला बेशुद्धीचं एनेस्थिसीया इंजेक्शन देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं दाखवलं. या प्रकरणाचा खुलासा सहा महिन्यानंतर झाला आहे. या प्रकरणी एका डॉक्टरला अटक करण्यात आली असून आरोपी डॉक्टरच नाव महेंद्र रेड्डी आहे.
Pune Crime: सत्र न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत व्यक्तीची आत्महत्या; चिठ्ठीत केसचा उल्लेख
काय घडलं नेमकं? प्रकरण काय?
डॉ. महेंद्र रेड्डीने (31) आणि त्याची MBBS एमडी पत्नी कृतिका (28) हे दोघे दाम्पत्य बंगळुरुतील मुन्नेकोलाला परिसरात राहत होते. 21 एप्रिल 2025 ला कृतिका अचानक आजारी पडली. पतीने तिला रुग्णालयात नेलं मात्र तिला तिथे मृत घोषित केलं. रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्य झाला होता. याप्रकरणी मराठाहल्ली पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
खळबळजनक पुरावे सापडले
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. घटनास्थळी पोलिसांनी तपास केल्यानंतर तिथे धक्कदायक पुरावे समोर आले. घटनास्थळावरून कॅनुला सेट, इंजेक्शन ट्यूब आणि अन्य मेडिकल उपकरण जप्त करण्यात आले. त्यांना तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं. तसच कृतिकाच्या सॅम्पललाही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं. जेणेकरून मृत्यूचं कारण उघड होईल.
रिपोर्टमध्ये सगळं सत्य समोर
एफएसएल रिपोर्ट येताच मृत्यच कारण समोर आलं. डॉ.कृतिकाचं विसरा रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला की, तिच्या शरीरात प्रोपोफोल नावाचं शक्तिशाली एनेस्थेटिक ड्रग्ज होतं. हे सामान्य उपचारासाठी देण्यात येत नाही. त्यामुळे आरोपी डॉक्टरवर पोलिसांना संशय आला. रिपोर्टच्या माध्यमातून डॉ. कृतिकाचा पती डॉ. महेंद्र रेड्डी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
का केली हत्या?
६० वर्षीय मुनी रेड्डीने जे कृतिकाचे वडील आहेत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी त्यांची छोटी मुलगी कृतिकाचं लग्न 26 मे 2024 रोजी डॉ. महेंद्र रेड्डी यांच्यासोबत लावलं. कृतिका एमबीबीएस,एमडी डॉक्टर होती. लग्नानंतर पती-पत्नी बंगळुरुच्या गुंजूर येथे राहत होते. त्यांचा आरोप आहे की, लग्नानंतर डॉ. महेंद्र रेड्डी पत्नीकडून अपेक्षा ठेवत होता. त्याला एक रुग्णालय सुरु करायचं होतं. त्यामुळे तो सासरच्या लोकांकडे पैशांची मागणी करायचा.
Odisa Crime: दोन दिवसांच्या नवजात बाळाची विक्री! आईनेच केला ५० हजारात सौदा; चार मुलं झाली म्हणून…