मुंबई : मुंबै बँक घोटाळ्या प्रकरणी आज पुन्हा एकदा प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे आज पुन्हा चौकशीसाठी माता रमाबाई मार्ग पोलीस ठाणेमध्ये हजर झाले आहेत. प्रवीण दरेकरांची दुसऱ्यांदा चौकशी होत आहे. यापुर्वी याच प्रकरणात दरेकर यांना नोटीस बजावत, ४ एप्रिलला त्यांची तीन ते साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती.
मुंबई बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. प्रवीण दरेकर हे कामगार संस्थेचे सभासद होण्यासाठी पात्र नाहीत. तरीही त्यांनी मुंबै बँकेच्या संचालकपदासाठी कामगार मतदारसंघातून अर्ज भरला. ते बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी 2011 ते 2021 अशी 10 वर्षे संचालक पद भूषवले, असा आरोप सहकारी संस्था, मुंबईच्या सहनिबंधकांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे आपचे नेते धनंजय शिंदे यांनी केला आहे.
[read_also content=”विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा एकदा समन्स https://www.navarashtra.com/maharashtra/leader-of-opposition-in-the-legislative-council-praveen-darekar-get-summoned-once-again-nrps-266830.html”]
[read_also content=”रेशनचा ३१० क्विंटल तांदूळ पकडला, पांढरकवडा पोलिसांची कारवाई, पुन्हा एकदा धान्याच्या काळ्या बाजाराचा प्रश्न ऐरणीवर https://www.navarashtra.com/maharashtra/310-quintals-of-ration-rice-seized-pandharkavada-police-action-black-market-issue-of-grain-once-again-nraa-267330.html”]