मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दरेकर यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यानुसार दरेकर यांना 11 एप्रिल रोजी माता रमाबाई आंबेडकर पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे(Praveen Darekar’s difficulties increase).
आठवडापूर्वी दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलिसांमोर चौकशी झाली होती. त्यावेळी स्वतः दरेकर यासाठी पोलिसांसमोर हजर झाले होते. त्यावेळी गरज लागल्यास पुन्हा बोलविण्यात येईल, असे पोलिसांनी दरेकरांना सांगितलं होतं. दरेकरांनीही पोलिसांचे म्हणणे मान्य केले होते. मात्र, आता याच प्रकरणी दरेकरांना पोलिसांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. बोगस मजूर प्रकरणी आपचे धनजंय शिंदे यांनी दरेकरांविरोधात तक्रार दाखल केली होती.
मुंबै बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतरदरेकर हे मजूर नसल्याचे सांगत त्यांना अपात्र ठरविले. मजूर म्हणून दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले होते.
मजूर म्हणजे अंगमेहनतीचे आणि शारिरीक श्रमाचे काम करणारी व्यक्ती, तसेच त्याचं उपजिविकेचं मुख्य साधन हे मजुरीच असेल, असे सहकार विभागाने स्पष्ट केले होते. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले होते.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]