• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • President Draupadi Murmus Speech In Maharashtra Legislative Council In Marathi

मराठी कविता म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भाषणाला सुरुवात; महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा संदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. आता त्यांनी राज्याच्या विधान परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीभाषेमध्ये कविता म्हणून केली. तसेच महिला शक्तीकरणावर भर देत राज्यातील कृर्तत्ववान महिलांचा उल्लेख केला.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 04, 2024 | 02:04 PM
President Draupadi Murmu's speech in vidhan parishad

फोटो - ट्वीटर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये उपस्थिती लावली. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मागील सहा वर्षातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण असे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विधान परिषदेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मराठी कवितेच्या पंक्ती म्हणून भाषणाला सुरुवात केली. तसेच महिला शक्ती आणि संधीबाबत भाषणामध्ये संबोधित केले.

काय म्हणाल्या राष्ट्रपती मुर्मू?

महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘बहुत असोत सुंदर, सम्पन्न की महा, प्रिय अमुचा एक, महाराष्ट्र देश हा’, या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या कवितेने सुरुवात केली. तसेच विधान परिषदेच्या कामकाज आणि इतिहासाचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून केला. भाषणामध्ये राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहीलेल्या महाराष्ट्रांने देशात अनेक कायदे, सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे. 103 वर्षे झालेल्या महाराष्ट्राच्या कायदेमंडळाने राज्यातील नागरिकांच्या आशा-आकांक्षांना अभिव्यक्त केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कायदेमंडळाचे सदस्य होते. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या कायदेमंडळाला होणे हे सौभाग्य आहे. आपल्या विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे यांनी ‘मनरेगा’ योजना आणली. महाराष्ट्राच्या समृद्ध विधानपरिषदेने लोकशाही परंपरांना समृद्ध केले आहे,” असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले आहे.

महिला सशक्तीकरणावर भर

मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणामध्ये महिला सशक्तीकरणावर प्रकाश टाकला. महिलांना संधी आणि सहाय्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ मॉसाहेब आणि सावित्रीबाई फुले यांचा आवर्जुन उल्लेख केला. राष्ट्रपती म्हणाल्या, “आपण सर्वांनी महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलणे, त्यात सुधारणा करणे याची जबाबदारी आहे. या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर महिलांविषयीचा योग्य दृष्टिकोन विकसित होईल. राजमाता जिजाबाईंची ही भूमी आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिला शिक्षणाचा पाया घातला गेला. महिलांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा थांबायलाच हव्यात. महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभा पाटील या मराठी महिलेकडे जातो. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, उपसभापती या महिला आहेत. महाराष्ट्राच्या मुली देश आणि राज्याचा गौरव वाढवतील,” असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधले.

विधान परिषदेच्या या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह आमदार उपस्थित होते.

Web Title: President draupadi murmus speech in maharashtra legislative council in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 02:02 PM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council
  • President draupadi murmu

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Patka : राहुल गांधींकडून राष्ट्रपतींचा अपमान? अनेकदा सांगूनही आसामचा पटाका घालण्याची झिडकारली विनंती
1

Rahul Gandhi Patka : राहुल गांधींकडून राष्ट्रपतींचा अपमान? अनेकदा सांगूनही आसामचा पटाका घालण्याची झिडकारली विनंती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Feb 02, 2026 | 05:30 AM
नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

Feb 02, 2026 | 04:15 AM
Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Feb 02, 2026 | 02:35 AM
अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

Feb 02, 2026 | 01:15 AM
Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Feb 01, 2026 | 10:07 PM
Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Feb 01, 2026 | 09:37 PM
Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

Feb 01, 2026 | 09:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.