पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी थांबता थांबेना; ऊस जाळला, पाईपलाईनही फोडल्या (File Photo)
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भाळवणी-शेळवे रस्त्यावरील शेतकऱ्यांचे अज्ञात व्यक्तीकडून पाईपलाईन फोडणे, ऊस जाळणे, बग्यास जाळणे, बोअरची मोटर तोडून बोअरमध्ये सोडणे, जनावरांच्या चाऱ्याचा गंजी पेटवून देणे असे प्रकार वारंवार केले जात आहेत. अशा विविध कारणांमुळे सदर शेतकरी हवालदिल झाले असून, रीतसर पोलीस तक्रार करूनही पोलीस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोपट एकतपुरे यांनी केळीच्या पिकांसाठी उसाचे बग्यास आणले होते. सदर बागेस रात्री पेटवून दिले. नंदकुमार कापसे यांच्या शेतातील मकवानाची गंज रात्री पेटवून दिली. जगन्नाथ शिंदे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला. प्रसंगावधानामुळे पेटलेला ऊस विझवण्यास यश आले. प्रशांत माळवदे यांच्या बोरमधील मोटार, पाईप, केबल, दोरी कट करून मोटार बोरमध्ये सोडली आहे. त्याचप्रमाणे देविदास लिंगे यांच्या शेतातील चेंबर, सेंचुरी फोडून इतरत्र नेऊन टाकण्यात आली.
हेदेखील वाचा : जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवावं; श्रीरंग बारणेंची हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी
दिलीप वाघमारे यांच्या विहिरीवरील मोटार, पाईपलाईन, बोरची पाईपलाईन तोडून टाकण्यात आली. मोहन वाघमारे यांच्या शेतातील मोटारीच्या पेटीला करंट देण्यात आला होता. तसेच ऊसही पेटवून दिला आहे. चंद्रकांत शिंदे यांच्या शेतातील मकवानाची गंज पेटवून दिली. घराजवळ जादूटोणा करून लिंबू, सुई, दाबन, खिळे, बाहुल्या टाकल्या जात आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही गेली एक-दोन दिवसात दिलीप वाघमारे व वैभव वाघमारे यांच्या शेतातील ठिबक, पाईपलाईन ,जळून खाक झाली. रणजित मदने यांच्या शेतातील चेंबरचे, पाईपलाईनची फोड करण्यात आली आहे.
तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊनही पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून केली जात आहे.
हेदेखील वाचा : आत्ता समोर आला पाकिस्तानचा खरा चेहरा; मंत्री इशाक दार यांनी पहलगाम दहशतवाद्यांना म्हटले ‘स्वातंत्र्यसैनिक’