मंचर : आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी (नांदूर) गावचे सुपुत्र प्रा. डॉ. रविंद्र नामदेव चिखले यांना भौतिक शास्त्र विषयाची पीएच. डी प्राप्त झाली आहे. चिखले यांनी मुंबई विद्यापीठातून ही पदवी संपादन केली. प्रा. चिखले यांनी इनव्हेस्टीगेशन ऑफ स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीकल अॅन्ड मॅग्नेटिक फीचर्स ऑफ निकेल कोबाल्ट फेराइटस सबस्टीट्युटेड वुईथ रेअर अर्थ अयन्स ॲन्ड देअर रिस्पॉन्स टू इरॅडिएशन या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला होता. त्यांना गुरुनानक कॉलेज, मुंबईमधील प्रा. डॉ. पुष्पींदर भाटिया यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. चिखले हे सन २००८ वासून जे. एस. एम. कॉलेज, अलिबाग येथे भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल टाकेवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी कौतूक केले.