कल्याण : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी (Demand) संपूर्ण राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (State Employees Strike) सुरु असून कल्याणमध्ये देखील याचे पडसाद उमटले आहेत (Reactions In Kalyan). कल्याणमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या (Maharashtra State Shikshan Kranti Sanghatna) माध्यमातून शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले (Teachers worked wearing black ribbons). तर महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा सचिव थॉमस शिनगारे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कार्यलयावर धडक देत निवेदन सादर केले (Statement submitted). यामध्ये निवेदनात २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व नंतर अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना तसेच २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना याचे संस्थापक कै. माजी आमदार रामनाथ मोते असून याचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांच्या आदेशानुसार प्रत्येक तहसीलदार कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर जे कर्मचारी नियुक्त झाले आहेत त्यांना शासनाने पेन्शन बंद केली आहे (Government Closed The Pension). या कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरु करण्याची मागणी करण्यात आली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काळ्या फिती लावून निषेध करत असल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली.
[read_also content=”सरकारचं ठरलं! महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य सरकारी कर्मचारी संपातून माघार, जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार https://www.navarashtra.com/maharashtra/update-maharashtra-state-primary-teachers-association-withdraws-from-state-government-employees-strike-state-government-to-set-up-committee-for-old-pension-scheme-nrvb-376114.html”]
यावेळी अमिता पाठक, रुपाली कुलकर्णी, उमा सिरगुरकर, मिलिंद बागुल, दिलीप पाटील, प्रशांत जावळे, राजेंद्र राठोड, रोहिणी बाठे, पूनम सिंह, बिन्सी बेल्सन आदी शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते.